समाजाविषयी साहित्यिकाची भूमिका
कोणतेही साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्यात समाजाचे चांगले वाईट प्रतिबिंब दिसत असते. साहित्यिक आपल्या साहित्यातून समाजासमोरील असलेल्या विविध आर्थिक, सामाजिक, धार्मिक, लैगींकभेद अशा प्रश्नांवर भाष्य करत असतो. नुसते आपल्या साहित्यातून समाजाचे मनोरंजन करणे एवढेच काम साहित्यिकाचे नसते तर त्याच्या साहित्यातून समाजाला योग्य अशी दिशा मिळणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते. आपल्या लेखणीतून समाजामधील ज्वलंत प्रश्नावर आसूड ओढण्याचे काम साहित्यिकाने करणे गरजेचे असते.
साहित्यिकाने कोणत्याही एका पक्षाची, धर्माशी, मताची, प्रवाहाची बाजू न घेता समाजात जे काही चांगले घडत आहे त्याच्या पुरस्कार करणे त्याला प्रोत्साहन देणे, त्याला बळ देणे व तसेच जे काही निरपेक्षपणे, तटस्थ भूमिकेतून करणे गरजेचे आहे तरच त्याच्या साहित्याला एक वजन प्राप्त होईल. साहित्यिकाने प्रस्थापितांचे लांगुलचालण न करता आपले विचार प्रखरपणे मांडणे गरजेचे आहे. साहित्यिकाच्या लेखणाचा थाक सत्ताधा-यांना वाटणे गरजेचे असते. त्याच्या मनात समाजाविषयी कणव असणे गरजेचे आहे. साहित्यिकाने प्रसिध्दीच्या पाठी न लागता समाजाच्या, वंचीत व शोषीत घटकांसाठी आपली लेखणी झिजवणे व त्या घटकांना योग्य तो न्याय मिळवून देणे गरजेचे आहे.
इतिहासाचा मागोवा घेतल्यास साहित्यिकांनी समाजासाठी आपली भूमिका चोखपणे कशी बजावली हे खालील बाबींवरून आपल्याला लक्षात येवू शकेल.
महाभारत, रामायण, बायबल, कुराण या सारखे महान साहित्य मानवाच्या जगण्याची दिशा ठरवतात. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी माणसाने कसे वागले पाहिजे? त्याचा जगण्याचा उद्देश काय? स्वतःच्या व इतरांच्या उन्नतीसाठी काय केले पाहिजे? याचे सार या साहित्यातून आपणास मिळते. मानवास जीवनाच्या वाटेवर प्रकाश देण्याचे काम हया साहित्यातून करण्यात आले आहे. त्यामूळेच हे साहित्य व साहित्यिक मानवास वंदनीय व पुजनीय झालेले आहेत. हाच ठेवा समस्त मानवजातीला चिरकालीन राहणार आहे.
आपल्या समाजाला संत साहित्यिकांची एक मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, कबीर, गाडगेबाबा यांच्या साहित्यातून समाजाला योग्य दिशा मिळाली. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांची गाथा, तुकारामांचे अभंग, रामदासांचे श्लोक, कबीरांचे दोहे आजही समाजाला मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात. यांच्या साहित्यातून समाज घडतो. त्याला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त होते.
भारताच्या स्वातंत्र्यामध्ये साहित्यिकाची अत्यंत मोठी भूमिका आहे. डॅा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक अशा स्वातंत्र्यविरांनी व साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून इंग्रजांच्या राजवटीवर कोरडे ओढले. निद्रीस्त समाजाला जागृत केले, त्यांना स्वातंत्र्याचे मोल पटवून दिले व त्यामुळे समाज एकत्रित आला व त्यांच्या अथक प्रयत्नामुळे, अपार देश-प्रेमा मुळे इंग्रजांना हा देश सोडून जाणे भाग पडले व देशाला स्वातंत्र्य मिळाले. जे काम तलवारी, बंदूका करू शकत नाहीत ते काम लेखणी करू शकते एवढी ताकद त्यात आहे हे देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावरून आपल्याला लक्षात येईल.
देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी काही वाईट प्रथा समाजामध्ये जशाच्या तशा होत्या. समाज त्यातून मुक्त झाला नव्हता. सतीची प्रथा, अस्पृश्यता, बालविवाह, स्त्रीशिक्षणा बद्दल असलेली अनास्था, अंधश्रध्दा असे प्रश्न समाजामध्ये ठाण मांडून होते व त्यामुळे समाजाची अधोगती होत होती. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या साहित्यातून अस्पृश्यता निवारण्याचे काम केले. अस्पृश्य समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याने काम, त्यांना संगठीत करण्याचे काम, त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे काम डॅा. बाबासाहेबांनी आपल्या लेखणीच्या माध्यामातून केले. त्यांच्या साहित्यामूळे समाजात एक क्रांती घडून आली. साहित्याचे महत्व यातून अधोरेखीत होते. राजाराम मोहन रॅाय यांनी सतीची चाल बंद करण्यास भाग पाडले. आपल्या लेखणीतून समाजाला याविषयी जागृत केले. महात्मा फुले यांनी शिक्षणाचे विशेषत: स्त्री शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. वि. दा. सावरकर यांनी समाजाला विज्ञाननिष्ठा जागृत करण्याचे काम केले. या सर्व साहित्यिकांनी नुसते लिखाण न करता प्रत्यक्ष समाजात जावून आंदोलन, सत्याग्रह, उपोषण अशा मार्गातून समाज जागृत करण्याच्या प्रयत्न केला. म्हणजेच साहित्यिकाची भूमिका लिखाणापुरती मर्यादीत नाही तर समाजातील प्रश्नाला प्रत्यक्ष समाजात जावून भिडण्याचीही आहे हे या सर्वांच्या त्यावेळेच्या त्यांच्या भूमिकेतून आपल्याला लक्षात येवू शकेल.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात पु.ल. देशपांडे, आचार्य अत्रे यांनी आपल्या विनोदी लेखनातून समाजाच्या विविध विषमतेवर, समस्येवर आपल्या खुमासदार शैलीमध्ये भाष्य केले. प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. समाजाचे प्रश्न मांडणे ही जरी साहित्यिकाची भूमिका असली तरी समाजाचे मनोरंजन होणे हे देखील तेवढेच गरजेचे आहे. माणसाच्या जीवनात त्याच्यासमोर अनेक प्रश्न असतात. वैयक्तीक, प्रापंचीक, सामाजीक, आर्थिक प्रश्नाने तो त्रस्त झालेला, असतो दुःखी असतो. साहित्य त्यास यातून विरंगुळा देण्याचे काम करते. त्याचे ते मनोरंजन करत असते. “वाचाल तर वाचाल” या वाक्यातून असे दिसते कि चांगले साहित्य माणसाच्या जीवनात वाटाडयाची भूमिका बजावत असते. वि.स. खांडेकर, बाबा कदम, शिवाजी सावंत, ना.सी.फडके, रणजित देसाई, व.पु. काळे, द.मा. मिराजदार, शांता शेळके, बहिणाबाई चौधरी, ग.दि. माडगुळकर, सुरेश भट, भा.रा. तांबे, नारायण सुर्वे, विठठल वाघ, शिवाजीराव भोसले, मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, फ.मु. शिंदे, प्रविण दवणे, अशा थोर साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून समाजाचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसाची जगण्याची उमेद वाढविली आहे.
स्वामी विवेकानंद, डॅा. अब्दुल कलाम, शिव खेरा यांचे साहित्य तरूणांचे स्फुलिंग चेतविण्याचे काम करते. कित्येक थोर, यशस्वी व्यक्ती चांगले साहित्य वाचण्यातून घडलेल्या आपण बघतो. म्हणजेच साहित्य जीवन घडविण्याचे काम करते. कित्येक निराश व्यक्तींना पुन्हा उभारी देण्याचे काम साहित्याने केले आहे. राष्ट्रगीताची रचना करणारे रविंद्रनाथ टागोर यांचे साहित्यातील योगदान विसरणे शक्य नाही.
चांगले साहित्य हा समाजासाठी असलेला “अमूल्य ठेवा” आहे व ज्यांनी हे साहित्य आपल्या सिध्दहस्त लेखणीतून साकारले ते सर्व साहित्यिक थोर आहेत. म्हणूनच काही साहित्यिकांना ‘भारतरत्न’ म्हणून देखील नावाजले गेले आहे. एवढा लौकीक त्यांचा साहित्याचा आहे. साहित्यिकाची समाजाविषयी असलेली भूमिका ही फार मोठी व जबाबदारीची आहे. तो समाजासाठी योग्य दिशादर्शक, अचूक मार्गदर्शक, अविरत दिपस्तंभाच्या भूमिकेतून काम करत असतो. म्हणून आजच्या साहित्यिकांनी ही जबाबदारी ओळखून आपली साहित्य-सेवा करावी . आपण समाजाचे काही देणे लागतो, हे साहित्यकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नुसते लिखाणापुरते, साहित्यनिर्मितीपुरते आपल्याला मर्यादित न ठेवता आपला परीघ वाठवावा व प्रत्यक्ष समाजात जावून आपल्या परीने समाजसेवेसाठी आपले योगदान दयावे असे येथे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. आपण समाजाला बांधील आहोत ही भावना साहित्यिकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment