हायकू कविता

तू उदास
मीही उदास
प्रेमाचे  दास
*************
धावून धावून
आता मी थकलो
थोडाच मी उरलो
*************
तूला पाहिल्यापासून
माझा मी ना उरलो
हरवून गेलो
*************
तू म्हणतेस
माझ्यात काय पाहिलं
हेच नाही उमजलं
**************
बायको तुमची अन माझी
सारखीच असते
दुमत नसते
**************
तुझ्या साथीने
जग मी जिंकेन
नाही काही होत एकटयाने
********************
तुझी साथ
हवीहवीशी
कुठे शिंकली  माशी
**************
साथ माझी
सोडू तू नकोस
प्रेमाचा तास
*************
प्रेमात
व्यवहार नको
स्वप्न थाटात
************
तू गेलीस
मी राहिलो तिथे
तू भेटली जिथे
*************

© महेश भा. रायखेलकर



Comments

Popular posts from this blog