देवाची पूजा

मी माझे काम अगदी प्रामाणिकपणे  करतो
मी  आई-वडिलांची  मनोभावे सेवा करतो
म्हणजेच मी देवाची पूजा करतो !
मी समाजातील वंचितांचे अश्रू पुसतो
मी निसर्गावर भरभरून  प्रेम करतो
म्हणजेच मी देवाची पूजा करतो !
मी देशातील कायदे काटेकोरपणे पाळतो
मी स्त्रियांना उचीत  सन्मान देतो
म्हणजेच मी देवाची पूजा करतो !
मी प्रसंगी देशासाठी प्राण देण्यास तयार असतो
मी जात-धर्माच्या उभ्या  रेषा मारत नाही
म्हणजेच मी देवाची पूजा करतो !
मी पूजा-अर्चा, उपास-तापास अश्या
कर्म कांडात पडत  नसतो
म्हणून मी काय नास्तीक ठरतो ?

महेश भा. रायखेलकर



Comments

Popular posts from this blog