Posts

Showing posts from February, 2018
Image
माझी माय मराठी  माझी माय मराठी आहे  सौंदर्याची  ती खाण प्रत्येक मराठी माणसास आहे तिचा गर्व आणि अभिमान माझी माय मराठी प्रथम  पडले  तिचे बोल  कानावर तिच्यासोबत खेळत, बागडत आला माझ्या जीवनाशी  आकार माझी माय मराठी भाग्यवान जेव्हा आली ती ओठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा तिचे बोल बोलण्यासाठी माझी माय मराठी आहे आमची ती शान तिच्या एक एक शब्दास आहे अमृताचा मान माझी माय मराठी लावी आम्हा गोडी अन  करी माया राहूदे अशीच आयुष्यभर आमच्यावर  तिच्या प्रेमाची छाया माझी माय मराठी जो पर्यंत  आहे आत्मा शरीरात परत परत  लिहीन  तिच्या जय- जयकाराचे मी गीत ©  महेश भा. रायखेलकर
Image
जय शिवाजी ! जय शिवाजी !! थोर पराक्रमी , ध्येयधोरणी ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! जिजाऊचा बाळ, शहाजीचां लाल ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! भवानी देई तलवार, शत्रूवर करी वार ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! स्त्रियांचा आदर, कडेलोट जर आली तक्रार ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! अफजलखानाचे फाडे पोट , शाहिस्तेखानाची तोडी बोटं ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! स्वराज्याचे बांधी तोरण, रयतॆच्या हिताची राबवी धोरण ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! गोब्राह्मण प्रतिपालक, मावळ्यांचा नायक ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! श्रीमानयोगी, ज्ञानयोगी ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! तानाजी,बाजी सारखे घडवी सरदार ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! साक्षात शिव अवतार, प्रजेच्या मनात आदर ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! कुलदिपक, खरा लोकनायक ! जय शिवाजी ! जय शिवाजी !! राजाधिराज, ओरंगजेबाचॆ झुकवे शीष ! जय शिवाजी ! जय शिवाजी!! हिंदवी स्वराज्य स्थ।पक,मुगलांना बसवे धाक !  जय शिवाजी ! जय शिवाजी!! छावाचा पिता, जाणता राजा !  जय शिवाजी ! जय शिवाजी !! आमचे दैवत,होऊ नतमस्तक ! जय शिवाजी ! जय शिवाजी!! जय शिवाजी ! ज...
Image
काही हायकू आज हसतात जे तुमच्यावर उद्या  जयजयकार ++++++++++++++++ प्रेमाला एक दिवस कसा पुरतो आयुष्यभर उरतो +++++++++++++++++ कोण कोणाच्या प्रेमात पडेल कसं मी सांगेल ++++++++++++++++ नुसतं प्रेमच करत बस पोटाला उपवास ++++++++++++++++ परीक्षेचे आहेत सध्या दिवस पालक चिंतेत +++++++++++++++ नोकरी लागेल छोकरी मिळेल पोरं होतील +++++++++++++++ एक गोष्ट तरी खरी सांग उगाच टांग ++++++++++++++ बँकेत नाहीत म्हणे पैसे  असे कसे +++++++++++++ ऊन बाहेर आहे फार पी पाणी थंडगार +++++++++++++ जे सांगतो ते करतो बाता मारतो ++++++++++++++ महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू तुझ्या जीवनातून झालो मी दूर काळ झाला क्रूर ************ भूतकाळ जेव्हा वर्तमानकाळात डोकावतो   संसार मोडतो   *************** रोज चे तेच तेच का गाता रडगाणे व्हा शहाणे ************ भूतकाळाचा आढावा  घ्या वर्तमनात जगा भविष्यासाठी आळस त्यागा ****************** वेळेला द्या पैसाएवढेच महत्व यशस्वी होंण्याचे हेच  तत्व **************** लोकं काय म्हणतील याचा विचार करू नका कालांतराने तेच चांगलं बोलतील *********************** स्वतः बरोबर इतरांचाही विचार जो करतो तोच माणूस असतो ********************* जाता जात नाही ती म्हणजे जात माणुसकीचा घात *******************
Image
हायकू कविता **************** लागली आपल्या प्रेमाला कोणाची तरी नजर म्हणून तर गेलीस तू दूर ******************* जे जे मनात आले ते ते करून पहावे का उगीच झुरावे ================= तुझा माझा सहवास एवढाच होता करून घेवू नकोस त्रास ================= ***************** गैरसमज झाला तुझा मी तसा नाही समजावण्याचा प्रयन्त माझा ******************** देशहितशिवाय कोणतीही गोष्ट मोठी नाही मरण आले तरीही **************** परत परत जन्म घ्यावा या भूमीत हेच मनीचे  गीत *************** जेव्हा तिरंगा नफात फडकतो ऊर भरून येतो *************** जो कोणी देशाकडे वाकडया नजरेने बघेल त्याचे  डोळे काढेल **************** देशभक्त गेले फासावर याची जाणीव ठेवा नका करू एकमेकांवर वार ******************* मतभेद जरूर असावेत मनभेद नसावेत **************
Image
काही हायकू तू म्हणती माझं बरं मी म्हणतो तुझं बरं   कोणाचं खरं                                                                           +++++++++++ उगाच लांबण लावून बोलु नकोस थोडक्यात सांग तुझं म्हणणं ++++++++++++++++++ एकदाच केलं मी प्रेम तेही फसलं +++++++++++++++ माझ्या हातात काही नाही सगळं तुझ्या होकारात ++++++++++++++++ जीवनात धरसोड वृत्ती नको हवी भक्क्म पकड +++++++++++++++ कोणीच काही करत नाही त्यात मीही ++++++++++++++ मन झाले माझे जड डोळे ओले ++++++++++++++ घातलेस तू डोळ्यात काजळ दिसेना तळ ++++++++++++++  तू कधी वेळ सांभाळलीस मी सदा आधी ++++++++++++++ माझ्या मनाची आहे तूला जाणीव नको करू कीव +++++++++++++ महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू  समोरा समोर बसून बोलू आपण गैरसमज फार ************** लोक आपल्या मनासारखे कसे वागतील जीव खातील ******************* देशाचा विचार कोण करतो फक्त स्वाहाकार ***************** संघटन मध्ये आहे ताकद मिळेल दाद ****************** देशाशी फितुरी करू नका पाठीत सुरी ***************** जो आपले  ईमान विकतो स्वतःला खातो  **************** स्वतःची तारीफ नका करू तोंडेची वाफ ************** संकटात माणुस ओळखला जातो एरवी चांगला वाटतो **************** जीव गेला तरी बेहत्तर प्रेमा खातर *************** दुस-याच्या जीवावर काय मिरवितो स्वतः काही कर ************** महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू चंचल मन नाही कामाचं   घाला वेसन                                                                                                          *********** उनाडक्या करत फिरू नकोस चालेल माझा हात ************** अभ्यासात आहे तो हुशार नापास फार ************* शाळेत तो रोज जातो आणि झोपतो ************* मी चेष्टा करत नाही फक्त कुचेष्टा ************* कमी वेळात जास्त काम किरकोळ दाम ************* मी लाच खात नाही गरिबांवर टाच ************ राजकारण म्हणजे घोषणेचा वर्षाव कामाला नसे वाव ************** बायको आली मुलगा बिघडला आईबापाला विसरला **************** सुनेचे कौतुक कशाला करावे जिभेला  जपावे ****************** महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू जगात काहीच नाही शाश्वत चाललो जमवत =========== कायदाचा नसे   बसे धाक   गुंड निर्धोक   =========== झाडे तोडतांना विचार करा न थंड वारा =========== सतत कसला विचार करतेस सांग मला ============ संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतात कुसंस्कार चिकटतात =============== आपल्या माणसांना वेळ द्या नको कामाचा बहाणा ============== नेतेमंडळी येतात लगेच एकत्र राजकारणाचे सूत्र =============== गणित फार अवघड जाते डोकं खाते ==============  उद्याचे काम आज करा नको उशीरा ============== ऐनवेळेस होते फक्त फजिती कोण लक्षात ठेवते ============== महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू एकदा जीवनाची वाट चुकली अन फसली ============ सरकार काही करत नाही शेतकरी पाही ============== आज आहे म्हणे सूर्यग्रहण त्याचीदेखील ओढाताण   =============== सरकारी कामकाजात दखल नको जाल आत ============== तुझ्या गालावरची खळी अशी खुलते मन विरघळते =============== आपल्या माणसाला काय लाजायच लाज ठेव बाजूला ============== एकतर तुला कोणी विचारत नाही काळजी मला ============= मी झालो फार उतावीळ नको खीळ ============= स्वतः खातो ताजे अन्न शिळे देतो ============= सतत मोबाईल मध्ये  तुझी नजर जरा पहा वर ============== महेश भा. रायखेलकर
Image
माझ्या हायकू कविता  चल या जगापासून दूर जावू जगू मनापासुन ================ जग आहे फार वाईट सत्याचा शेवट ================= आपले जीवन मनापासुन जगा आहे छान ================= चिमणी देखील घरटे बांधते घराची आस भागवते ================== दिशाहीन जगणे सोडून द्या नको उद्या ================= माणसे मुखवटे घालून फिरतात खोटे दिसतात ================ सत्याची चाड आहे कोणाला नसती धडपड ================ काही गोष्टींची मला चीड येती त्या आड ================== क्षणाचीही नसे मला उसंत सांगतो निवांत ================== हसतेस तू फार गोड नाही तोड ================== महेश भा. रायखेलकर