काही हायकू
एक ना धड
भाराभर चिंध्या
सारेच अवघड
+++++++++++
ज्याची खावी पोळी
त्याची वाजवावी टाळी
अळीमिळी गुपचिळी
++++++++++++++
ज्याचं करावं भलं
तो म्हणतो माझच खरं
असं नव्ह बरं
++++++++++++++
अंधश्र्द्धेला बळी
पडू नका
सुळावरची पोळी
++++++++++++++
राजकारणात चांगले
लोक आले पाहिजेत
होईल देशाचे भले
+++++++++++++
साधी राहणी
उच्चं विचारसरणी
यशाची पायाभरणी
++++++++++++++
चांगल्या माणसांची
संगत करा
नको पोपटपंची
+++++++++++++
नको होवूस तू
अशी क्रूर
कर प्रेमाची फिकीर
+++++++++++++
काही गोष्टी
नशिबावर सोडाव्यात
मन होणार नाही कष्टी
++++++++++++++++
चांगले पुस्तक
गुरु बनते
मार्ग दाखविते
+++++++++++++++
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment