हायकू कविता
प्रेम केले
मी निरपेक्ष
तुटतांना रक्त तुझे सांडले
*****************
तू शिकलेली
मी अशिक्षित
प्रेमाचे भरीत
**************
प्रेम मी
निभावले
तू तोडले
************
तुझ्या प्रेमाची
ठेवली मी अपेक्षा
हाती उपेक्षा
***********
तुलाही कळले
मलाही कळले
प्रेम फुलले
**********
दे माझ्या
हातात तू हात
नाही सोडून जात
*************
उगीच जास्त
बोलू नये
शब्द स्वस्त
************
माझे मी
बघून घेईन
तूला सोबत नेईन
*************
प्रेमात मी
नाही पडलो
म्हणून तर वाचलो
**************
तूला पहाताच
बघतच राहिलो
मी हरलो
*************
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment