व्यर्थ न जावो बलिदान
याच साठी केला होता का स्वातंञ्याचा अट्टाहास
घ्यावा आपणच आज एकमेकांचा घास !
याच साठी गेले का देशभक्त फासावर
चालवावी आपण एकमेकांवर तलवार !
चालवावी आपण एकमेकांवर तलवार !
याच साठी बांधले का स्वराज्याचे तोरण
आजही व्हावे कोण्या द्रौपदीचे वस्त्रहरण !
आजही व्हावे कोण्या द्रौपदीचे वस्त्रहरण !
याच साठी केला होता का सत्याग्रह
देशापेक्षा धर्म मोठा चा करावा दुराग्रह !
देशापेक्षा धर्म मोठा चा करावा दुराग्रह !
याच साठी चालवली का स्वातंञ्याची चळवळ
देशद्रोहयांची चालुन घ्यावी आज वळवळ !
देशद्रोहयांची चालुन घ्यावी आज वळवळ !
याच साठी मिळवीले गेले का स्वातंत्र्य
वागण्या बोलण्यात नसावे कोणतेच ताळतंत्र !
वागण्या बोलण्यात नसावे कोणतेच ताळतंत्र !
याच साठी झेलल्या गेल्या का गोळया छातीवर
भ्रष्टाचाराने पोखरावे देशाचे घर !
भ्रष्टाचाराने पोखरावे देशाचे घर !
याच साठी भोगली का काळयापाण्याची शिक्षा
विखारी शब्दांनी करावी एकमेकांची दुर्दशा !
विखारी शब्दांनी करावी एकमेकांची दुर्दशा !
ऐका भारतमातेचे एकच आहे मागणं
व्यर्थ न जावो तिच्या पुञ्यांचे बलिदान !
व्यर्थ न जावो तिच्या पुञ्यांचे बलिदान ! !
व्यर्थ न जावो तिच्या पुञ्यांचे बलिदान !
व्यर्थ न जावो तिच्या पुञ्यांचे बलिदान ! !
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment