हायकू

१. कायद्या समोर सर्वजण  समान
    काहींना जेल मध्ये
   विशेष पाहुण्यांचा मान

२. शेतकरी आहे राजा
    सावकारी कर्जाचा
   त्यावर बोजा

३. जगावे लागेल
    तुझ्या वाचून
    माहित नाही  जिंकेल का हरेल ?

४. मांजर आडवी गेली
    कि काम होत नाही
    अंधश्रद्धा अजून नाही मेली

५. दारू मुळे
    माणूस संपतो
    व्यसनांचा अंत  असाच असतो

६. जे तुझ्या मनात
    सांग माझ्या कानात
    नको सांगू चारचौघात

७. त्त्यांनी प्रेम केलं
    तुमचं काय गेलं
    तरुणपण तुमचं संपलं

८. जा नको मागे
    वळून तु पाहूस
    प्रेमाच्या चक्रव्यूहात नको पुन्हा अडकूस

९.   या जन्मी
      नाही झालीस तू माझी
      भेटू पुढच्या जन्मी

१०. तू माझ्यासाठी
      बनली नव्हतीच
      चुकून पडल्या गाठी


© महेश भा. रायखेलकर







Comments

Popular posts from this blog