नोकरी करणारी ' आई'
घरी सोडून लहान पोर
जाते नोकरीला ती बाहेर
जरी शरीराने ती ऑफिसात
तरी मन राही तिचे आपल्या पिल्लात !
सवड मिळाली कि बोलते
मुलाला फोन वरुन
मुलाचे बोलणे ऐकून
कमी होतो तिचा कामाचा ताण !
मलाही वाटते रे बाळा
राहावे सतत तुझ्या जवळ
आपल्या आभाळाएवढया स्वप्नासाठीचालु रे माझी धावपळ !
मुल पडले आजारी-बिजारि
होई ती कावरी-बावरी
स्वतः ला दूषणे देत म्हणे
काय कामाची ही नोकरी !
शिस्तिसाठी थोड़ी ढिसाळ
म्हणे मला सोडून राहतो माझा बाळ
नका घेऊ त्याच्यावर
खोड्यांचा भलता तुम्ही आळ !
मुल बनते समजूतदार
वागते ते शहाण्यासारखे
त्याचे वागने पाहून
कौतुकाने त्यास ती निरखे !
येतांना मुलासाठी येते ती खाऊ घेऊन
मुल धावत जाऊंन बिलगे
तिला आलेली पाहून !
सुट्टी दिवशी असते ती फ़क्त मुलाची
कसर प्रेमाची भरून काढ़े
पूर्ण ती आठवड्याची !
नोकरीवाल्या 'आई' ची चालू तारेवरची कसरत
तिच्या घरट्याच्या सुखासाठी
चालू तिची अखंड मेहनत !
चालू तिची अखंड मेहनत !!
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment