काही हायकू
काही माणसे
गंमतीशीर असतात
सतत हसवतात
=============
आयुष्य कंटाळवाणे
बनवू नका
व्हा शहाणे
==============
जे येत
नाही ते करून पहा
काही नाही होत
=============
सगळी माणसे
सारखी नसतात
उगाच का शंका घेतात
===============
मी अद्याप
जगलोच नाही
केले काहीही
===============
तो जीवंत आहे
दिसतो मेल्यासारखा
चिंतातुर बुरखा
================
एका प्रश्नाचे
अनेक उत्तर
शोधा भरभर
================
काय केलं
म्हणे इतके दिवस
घेत होतो श्वास
================
सायकल सोडली
मोटार घेतली
ढेरी फुगली
===============
महागडे औषध
रोज खातो
व्यायाम टाळतो
==============
महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment