काही हायकू

सज्जन येत नाहीत
 एकत्र
दुर्जन मित्र
==========
ज्याला जे पाहिजे
ते मिळू दे
माझे राहूदे
============
मनाला काबूत
ठेवावे
म्हातारपणी सांगावे
=============
फुकटला सल्ला
देवू नये
भरावा गल्ला
============
पाणी वाचवा
पाणी जिरवा
मग मिरवा
===========
कधीतरी बायकोला
करून द्या चहा
प्रेमाचा मामला
=============
मेव्हणीचे फार
कौतुक करू नये
बायको समोर
=============
चोरीचा मामला
मामाही थांबला
मामीने चोपला
=============
लग्नानंतर माणूस
बनतो  काटकसरी
बायको बसते उरी
=============
लग्नानंतर हनिमूनला
जरूर जावे
टोमणे खावे
================

© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog