काही हायकू

आपण खूप
नियोजन करतो
नसीब बिघवडतो
+++++++++++
नवं वर्ष
नवा उत्साह
नवा हर्ष
++++++++++++
 उत्साहाने कामाला
सुरवात करा
निरूत्साह नाही बरा
+++++++++++++
स्वप्ने दुस-याला
न सांगावीत
पूर्ण करून दाखवावीत
++++++++++++++
पहिले स्वतः
करून पहावे
मग दुस-याला सांगावे
++++++++++++++
संकल्प करा
सिद्धीस न्या
संयम धरा
+++++++++++++
शुभेच्छा द्यायला
संकोच नको
बिन  पैसाचा मामला
++++++++++++
राजाघरी रोजच
दिवाळी
गरीबाची गुपचिळी
+++++++++++++
लहान मुलांवर
हात उगारु नका
नाजूक फुलपाखरं
+++++++++++++
चांगले दिसण्यावर
भर दिल्यापेक्षा
लक्ष द्या चांगले असण्यावर
+++++++++++++++++++

© महेश भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog