काही हायकू

परत परत
वळून पाहतेस
आणि म्हणे जातेस
****************
सरस्वती श्रीमंतांच्या
घरी पाणी भरते
तिलाही पोट असते
*****************
श्रीमंत माणूस
ज्ञानी असेलच असे नाही
पैसाने विकत घेतो काहीही
*********************
पैसा कमवावा
लागतो
फुकट ना मिळतो
*******************
पैसासाठी माणूस काहीही
करायला तयार
मांडलाय बाजार
*******************
पैसाने सुख विकत
घेता येतं
दुःख विकता  येतं
*****************
पैसाचे मोल
येथे फार
सारेच लाचार
***************
सुख दुःख
ऊन पाऊस
रात्र दिवस
****************
करावे तसे
भरावेच लागते
ना ते चुकते
***************
भूक  गरीब श्रीमंत
असा भेदभाव करत नाही
सर्वजण एकाच जात्यात
*******************


© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog