हायकू कविता

तंत्रज्ञानाने दूरचा
जवळ आला
जवळचा जिवंत का मेला
=================
मनातले कोणालातरी
सांगावेसे वाटते
कोण ऐकते
==============
थोडावेळ तरी
स्वतःशी बोला
मग बोंबला
=============
तुझ्या माझ्या
मनाच्या जुळल्या तारा
का भांडतेस तरातरा
================
प्रेमाचं माणूस
जवळ असावं
मग पहावं
==============
माणूस पैसे कमवण्यासाठी
धाव धाव धावतो
दवाखान्याचे बील भरतो
==================
माणसाच्या सर्व
इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत
होतील स्वर्गात
===================
त्याच त्याच चुका
करू नका
यशाला धोका
==================
हरलात म्हणजे
नाही संपलात
करा नव्याने सुरवात
================
आलेली संधी
नका दवडू
अपयश कडू
================

© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog