हायकू काही
श्रद्धेचा बाजार
भक्तजन फार
देव लाचार
===========
देव देवळात
यांनी कोंडला
भक्त रडला
=============
देवाच्यापायी ठेवतो
तो डोके
बाहेर धोके
==============
तुझ्या हाताला
मेहंदी लागली
जाग आली मला
==============
तू झालीस
परक्या घरची
का असं केलंस
==============
झेलले घाव खूप
झालो निबर
संकटांचा ताप
==============
नवरा-बायकोच्या भांडणात
कोणी पडू नये
बसेल थोबाडात
===================
लक्ष्मी-नारायणा
सारखा दिसतो जोडा
शालजोडीत हाणा
=================
लग्न झाले कि
मित्र दुरावतात
बायकोशी मैत्री करतात
==================
मैत्रीण आणि बायको
मध्ये फरक असतो
अविवाहित सांगतो
==================
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment