काही हायकू

रामालाही वनवास
चुकला नाही
आपण कोण खास
+++++++++++++
डोक्यावर पांघरून
घेवून झोपी गेलो
घोरायला लागलो
+++++++++++++



अकलेचे तारे
तोडू नका
हसतील सारे
+++++++++++++
नोकरी -धंदा सांभाळून
छंद करा
नाहीतर उपाशी मरा
++++++++++++++
ती तिच्या
संसारात चांगलीच रमलीय
मी आठवणीत तिच्या
++++++++++++++++++
कौतुकाने माणूस
शेफारून जातो
काहीही बडबडतो
++++++++++++++++++
माणसापेक्षा कधीकधी  जनावरे
शिस्तीत चालतात
अपघात ना करतात
++++++++++++++++
राजकारण म्हणजे
पैसे कमवण्याचा धंदा
मी उभारलोय यंदा
+++++++++++++++
बायकोचे मत
जरुर ऐकावे
मनाला येईल ते करावे
++++++++++++++++
लग्नांनंतरचे काही
दिवस चांगले असतात
असे नंतर म्हणतात
+++++++++++++++

© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog