हायकू कविता

कौतुकाने गर्विष्ठ
होवू  नका
होईल टिका
===============
जन्म मृत्यू
न आपल्या हाती
शेवटी माती
===============
काम, क्रोध, मत्सर
ठेवावे बाजूला
बनावे चांगला
===============
चेष्टा व कुचेष्टा
मध्ये अंतर असते
नको जीवघेणी थट्टा
==============
सण साजरे करूया
पर्यावरणाचा मान राखून
निसर्ग जाईल कोपून
================
माफ करतांना
नसावा मनात किंतु
बदला घेण्याचा वळू नये जंतू
==================
काळ वेळ
पाहून बोलावे
न व्हावे वाचाळ
==================
वेळ सत्कारणी
सतत लावावा
न वाया जावू दयावा
=================
करण्यासारखे आहे
बरेच काही
का तू वाट पाही
=================
दुस-याची बायको
सुंदर दिसते
लग्नानंतर कळते
==================

© महेश भा. रायखेलकर



Comments

Popular posts from this blog