हायकू कविता

तू माझ्यासाठी
स्वर्गातील अप्सरा
माझा फाटका सदरा
************
येता जाता
बघतेस काय
मारेल तूझी माय
**************
देवाने दिलंय
तूला भरभरून
गेलीस गर्वाने फुलून
**************
तुझा मलूल चेहरा
पहावत नाही
कसा होईल तो हसरा
***************
देव तारी
त्याला कोण मारी
चिरडून मेले देवाच्या दारी
******************
पोराने चांगले
पांग फेडले
वृद्धश्रमात ठेवले
****************
कोण गेलास
तु रे लागून
देवही झाला प्रसंगी दास
****************
 मोठेपणी तू
 कोण होणार
मोठा होणार
**************
काहीच तूला
कसे कळत नाही
भाव माझा चांगला
*************
माझ्या घराची
तू ग राणी
भरतो मी पाणी
************

Comments

Popular posts from this blog