मुक्त छंदातील हायकू

प्रत्येक गोष्टीत राजकारण
विकास न होण्याचे
तेच  एक कारण
=============
सत्य हरत नाही
असं म्हटलं जातं
खरं का ते असतं ?
=============
साधू कसले
हे संधीसाधू
श्रद्धाळू फसले
============
नको पाहूस
माझा असा अंत
सोसवेना त्रास
============
चंद्र सूर्य
रोजच उगवतात
पगार न मागतात
=============
वेळेला द्या महत्व
यशस्वी होण्याचे
हेच एक सत्व
===========
जीवन हि सुंदर
मरण हि सुंदर
जगणे सुंदर फार
===========
डोळ्याने टिपतो
तुझे सौदर्य
वासनेला वाव नसतो
============
तुझ्या मिठीत
मी विसावतो
दुःख विसरतो
============
तुझी चाल
मी बेहाल
लाजून तू लालेलाल
============

©महेश भा. रायखेलकर













Comments

Popular posts from this blog