पुस्तक परिचय "मृत्युंजय" (कादंबरी)

पुस्तक : मृत्युंजय (कादंबरी)
लेखक : श्री. शिवाजी सावंत
प्रकाशन  : कॉंटिनेंटल 
पृष्ठ संख्या : ६०१

                  "मृत्युंजय" या  कादंबरीने  मराठी साहित्यविश्वाला  एका उंचीवर नेवून ठेवले आहे. लेखक श्री. शिवाजी सावंत यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने महाभारतातील "कर्ण" या उपेक्षित, शापित  नायकाचा जीवनपट अशारितीने रेखाटला आहे कि वाचकाच्या मनात त्याच्याबद्धल सहानभूती व आदर निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.
                   समस्त सृष्टीला प्रकाश व जीवन देण्याया  प्रत्यक्ष सूर्याचा "कर्ण" हा  पुत्र. पण आपले जन्माचे रहस्य माहीत  नसल्याने आयुष्यभर उपेक्षित व अपमानित होवून आपले जीवन व्यतीत करतो  व शेवटी आपण कोण आहोत हे कुंती व श्रीकृष्ण यांच्याकडून समजून सुद्धा आपले कर्त्यव्य व मित्र धर्मापासून तो तसूभरही मागे हटत नाही. युद्धात आपण अधर्माच्या बाजूने लढतो आहोत व यात आपला मृत्यू अटळ आहे हे माहित असून सुद्धा दुर्योधनाला दिलेल्या वचनामुळे, त्याने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून व मित्र धर्म पाळण्यासाठी तो कौरवांच्या बाजूने युद्ध लढतो व शेवटी त्यात त्याचा मृत्यू होतो,  मृत्यूला कवटाळून देखील    आपल्या जीवन-कर्त्यव्यात तो विजयी ठरतो त्यामुळे  "मृत्युंजय" हे शीर्षक त्याची व्यक्तीरेखा मांडणाऱ्या या कादंबरीस योग्य ठरते.  आणि  सोबत या शिशुचा सांभाळ करतो    व दुसरा प्रसंग म्हणजे कर्ण रणांगणावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतांना सुद्धा जेव्हा एक याचक त्याला दान मागतो तेव्हा तो आपला सोन्याचा दात अक्षरशः तोडून याचकास देतो हे दोन्हीही प्रसंग वाचतांना डोळे भरून आल्याशिवाय रहात नाहीत                  
              हि कादंबरी कर्णाच्या मनोगत रूपाने चालू होते व नंतर त्याच्या जीवनावर प्रकाश टाकणा-या  व्यक्तीरेखा जसे कि कुंती, स्वतः कर्ण, दुर्योधन, वृषाली, शोण, श्रीकृष्ण यांच्या स्वरूपात वाचकांच्या समोर येते.मुखपृष्ठावर हाती धनुष्य व पाठी बाण असलेला 'कर्ण' व  या  व्यक्तीरेखा कादंबरीत चित्र रूपाने चित्रकाराने उत्कृष्टरित्या चित्रित केलेल्या आहेत.   या सर्व व्यक्तीरेखा लेखकाने अशाप्रकारे  रेखाटल्या आहेत की  कर्णाचे जन्मापासून चे मृत्यू पर्यंतचा जीवनपट यातून वाचकांसमोर उभा राहतो. ही कथा महाभारतातील असली तरी लेखकाने  हे लेखन जटील वाक्य रचना न करता ती अत्यंत सोपी करून  तो काळ वाचकांसमोर समर्पकपणे उभा केला आहे . कादंबरीच्या शेवटी  काही कठीण   शब्दांचे अर्थ व संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली आहे. या वरून लेखकाने "कर्ण" हि व्यक्तीरेखा अत्यंत अभ्यासपूर्वक वाचकांसमोर मांडली आहे हे लक्षात येते. महाभारत जणू  आपल्या समोर घडत आहे असा भास वाचकांना होणे ,  हि लेखकाच्या लेखणीची ताकद आहे .
            कुंती ,  कुंतिभोज राजाची  राजकन्या. दुर्वास ऋषींची मनोभावे सेवा केल्याने ते तिच्यावर प्रसन्न होतात व तिला  वर देतात "ज्या ज्या शक्तीचं स्मरण करून तू मंत्र म्हणशील ती ती शक्ती मानवरूपात क्षणात दासासारखी तुझ्या समोर उभी राहील आणि तुझ्या पोटी आपल्यारख्या तेजस्वी पुत्र निर्माण करून निघून जाईल". हा वर कुंतीच्या मनात घर करून राहतो. या वराची प्रचिती घेण्यासाठी ती सूर्याचे स्मरण करते  . सूर्यदेव प्रत्यक्ष तिच्यासमोर येतात व त्याच्या किरणांनी कुंतीस  गर्भधारणा होते. यथावस तिला पुत्र प्राप्ती होते.  तो म्हणजे "कर्ण" . कुमारी असतांना माता होणे हे त्या काळी  समाज मान्य नसल्याने व समाजाकडून अवहेलना टाळण्यासाठी ती आपल्या पुत्राचा   त्याग करते. ती आपल्या पुत्राला एका लाकडी पेटीत ठेवून गंगेच्या पाण्यात सॊडून देते . या प्रसंगी तिची वेदना लेखकाने इतक्या उत्कृष्टरित्या मांडली आहे कि वाचक तो प्रसंग वाचून   व्याकुळ झाल्याशिवाय राहात नाही.
          गंगेच्या पाण्यात वाहत आलेली हि पेटी कौरवांचे अश्वशाळा सांभाळणाऱ्या अधीरथला सापडते. तो तिला उघडतो व त्यात एक नवजात शिशु पाहून तो आश्चर्यचकित होतो व त्यास तो आपल्या घरी आणतो. तो व तिची पत्नी राधा या  शिशुचा सांभाळ करतात.
            यथावकाश कर्ण मोठा होतो.  युद्ध-शास्त्र शिकण्यासाठी  अधीरथ त्यास कौरव-पांडवांचे गुरु द्रोणांकडे घेवून येतो. गुरु द्रोण हे राजगुरू असल्याने व कर्ण सूतपुत्र असल्याने ते त्यास प्रशिक्षण देण्यास नकार देतात.
हा कर्णाच्या जीवनातील पहिला, त्याला डावलण्याचा प्रसंग. कर्णाला विश्वातील श्रेष्ठ धनुर्धारी बनण्याचा ध्यास असतो. तो त्या दिशेने अथक प्रयत्न करतो. .
            कौरव व पांडव या राजपुत्रांचे  प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरु द्रोण त्याची परीक्षा सर्व राजघरण्यासमोर घेण्याचे ठरवतात. तेथे "कर्ण" आपले कौशल्य दाखवण्यासाठी पोहचतो.  तेव्हा तो गुरु द्रोण व पांडवांकडून विशेषतः:अर्जुनाकडून अपमानींत केला जातो. तो खालच्या कुलातील असल्याकारणाने त्यास तेथे आपले कौशल्य दाखवण्याचा वाव दिला जात नाही. आपल्याला डावलण्यात आल्याची सल त्याच्या मनात कायम असते. याचे चित्रण लेखकाने मोठ्या खुबीने केले आहे. "माणूस कुलाने नाहीतर आपल्या कर्माने श्रेष्ठ ठरतो" अशी भावना कर्णाची असते.  हे लेखकाने त्याच्या वेळोवेळीच्या  संभाषनूतन अधोरेखीत केली आहे जी के आजच्या काळात देखील लागू होते. आपण नेमके कोण आहोत? आपल्याला हि कवचकुंडले कशी लाभली जी कि दुसर्यांना नाहीत?. आपल्या जन्माचे रहस्य काय? या सारखे प्रश्न कर्णाच्या मनात सारखे रुंजी घालत असतात. त्याच्या मनातील  हे द्वंद्व लेखकाने उत्तम मांडले आहे.
         या कौशल्य परीक्षेच्या दरम्यान त्याची ओळख कौरवांचा जेष्ठ राजपुत्र दुर्योधनाशी होते. दुर्योधन कर्णाच्या मनातील सल ओळखतो. तो त्याची पदोपदी बाजू देखील घेतो. त्याला आंगदेशाचा राजा बनवून त्याची मान उंचावतो. अपमानीत, उपेक्षित कर्ण दुर्योधनाच्या या आदराच्या, प्रेमाच्या वागणुकीने भारावून जातो . त्याच्या   उपेक्षित जगात दुर्योधन हा एकमेव व्यक्ती असतो कि ज्याने त्याला जवळ केलेले असते. त्याच्या उपकाराच्या भाराखाली तो दबून जातो . दुर्योधनाची साथ कधीही सोडायची नाही हे तो मनोमनी ठरवतो. तो त्यास तसे वचन देतो. या दोघांच्या मैत्रीतील काही प्रसंग लेखकाने सुरेख रेखाटले आहेत.

          'हस्तिनापूर राज्याचा खरा उत्तराधिकारी मीच' या भावनेने दुर्योधन पांडवांचा द्वेष करू लागतो. तो अनेक कट करून त्याना संपवण्याचा प्रयत्न करतो. कर्ण मुळात कपटी नसतो पण मित्र प्रेमापोटी व वेळोवेळी पांडवांकडून अपमानित झाल्याने तो दुर्योधनाची साथ देतो. द्रौपदी स्वयंवरात देखील कर्ण अपमानींत केला जातो . त्यामुळे पांडवांबद्धलच्या त्याच्या कटुतेमध्ये वाढ होते. शकुनी, दुःशासन,दुर्योधन त्याचे मन पांडवाबद्धल सतत कलुषित करण्याची नीती अवलंबतात. त्या कूट नीतीला कर्ण बळी पडतो. द्वेषाचे बीज कसे उगवते , त्यावेळची राजकारणातील क्रूर नीती हे  यातून दिसून येते.  'या विश्वातील श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन नसून मी आहे, परंतु माझ्या कुलामुळे मला सतत डावलण्यात आले आहे'  हि भावना कर्णाच्या मनात घर करून बसलेली असते.   . ही भावना दुर्योधन ओळखुन असतो .  अर्जुन व पांडवाच्या विरुद्ध वापरण्याचे प्रभावी अस्त्र कर्ण रूपाने आपल्या भात्यात आहे हे तो जाणून  असतो. दुर्योधन या कर्णाच्या भावनेस खतपाणी घालण्याचे काम करतो.  या वरून दुर्योधनाची कूटनीती लक्षात येते. कर्ण हा आपल्याच भावंडांशी वैर साधत आहे हे कुंतीला माहित असून देखील ती परिस्थिती समोर हतबल असते.  यावरून वाचकाला तिची अगतिकता व तळमळ दिसून येते.

       कौरव-पांडवांचे वितुष्ट विकोपाला जाते. दुर्योधन व शकुनी  पांडवास द्यूत खेळण्यासाठी आमंत्रित करतात . पांडव द्यूत क्रीडा हरतात. द्रौपदीचे वस्त्र हरण केले जाते. या प्रसंगी कर्ण आधीच्या अपमानाचा बदला  घेण्याच्या दृष्टीने  द्रौपदीला कुलटा संबोधून  अपमानित करतो. या वरून लेखकाने मानवी स्वभावाचे विवध कांगोरे  चित्रित  केलेले आहेत . या प्रसंगाने पांडव कर्ण व कौरवच्या विरुद्ध पेटून उठतात. त्यांना युद्धात ठार मारण्याची प्रतिज्ञा करतात.द्यूतात हरल्याने ठरल्याप्रमाणे पांडवाना वनवासास  जावे लागते.
       वनवास संपवून पांडव परत येतात. ते राज्याचा अर्धा हिस्सा दुर्योधनाकडे मागतात परंतु दुर्योधन सुईच्या टोका एवढीही भूमी पांडवांना देण्यास नकार देतो. प्रत्यक्ष श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी  कौरवांकडे जातात परंतु त्यांचा प्रयास दुर्योधन विफल ठरवतो. उलटपक्षी तो श्रीकृष्णाचा अपमान करतो.

           युद्धाने कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत फक्त नरसंहारच होणार आहे हे माहित असूनसुद्धा जर पांडवांना न्याय मिळवून द्यावयाचा असेल तर युद्ध अटळ आहे हे श्रीकृष्णाच्या लक्षात येते. पांडवदेखील आपला हक्क मिळवण्यासाठी व द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या अपमानाचा बदला  घेण्यासाठी कटीबद्ध होतात . ते कौरवांस यमससदनास पाठवून आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यास आसुसले असतात. द्रौपदी आपल्या विखारी बोलण्यातून पांडवांच्या मनात आपल्या अपमानाची धग व त्याचा सुड घेण्याची भावना कायम चेतवत असते. यावरून एखादी स्त्री अपमानीत झाली तर काय करू शकते हे वाचकांच्या लक्षात येते.
     अखेर युद्ध अटळ आहे हे श्रीकृष्णाच्या  लक्षात आल्यानंतर कर्णाला श्रीकृष्ण त्याच्या जन्माचे रहस्य सांगंतो. "तू पांडवांकडे चल.  तू त्यांचा जेष्ठ बंधू आहेस. ते तुझी सेवा करतील. तुला या राज्याचा राजा बनवतील." असे सांगून कर्णाला कौरवांच्या बाजूने लढण्यास तो परावृत्त करतो. परंतु कर्ण त्यास नम्रपणे नकार देतो. आपल्या जन्माचे रहस्य माहित होवून देखील तो दुर्योधनाची साथ सोडून देण्यास  तयार होत नाही. ऍकीकडे जन्मभर आपण आपल्या कुलामुळे उपेक्षित राहिलो. अपमानित होत  गेलो. आपण क्षत्रिय कुलातील आहोत. सर्व सुख, मान आपल्या पायाशी लोळण घेईल हे माहित होवून देखील तो आपला मित्र धर्माचा त्याग करण्यास तयार होत नाही. केवढे हे औदार्य !! .
    शेवटी कुंती  कर्णाला भेटते. "तू माझाच पुत्र आहेस. तू आपल्या बंधूंविरुद्ध युद्ध करू नयेस " या साठी ती त्यास विनविते. परंतु कर्ण आपल्या दुर्योधनाला दिलेल्या वचनापासून मागे हटत नाही. तो म्हणतो " जरी माझे  प्राण गेले तरी मी या प्रसंगी  दुर्योधनाची साथ सोडू शकत नाही  . परंतु मी तुला एक वचन देतो मी फक्त अर्जुनाशीश युद्ध करेल बाकी पांडवांशी नाही. तो जर युद्धात ठार झाला तर मी राहील. मी जर ठार झालॊ तर तो राहील. म्हणजेच पाच पांडवांचे तुझे हे  गणित चुकणार नाही" . हा प्रसंग लेखकाने अश्या प्रकारे रंगवला आहे कि वाचक देखील सदगतीत होतो.
      कर्णाचा दानशूरपणा ईतिहासात अजरामर  आहे. हा दानशूरपणा  लेखकाने अत्यंत चांगल्याप्रकारे टिपला आहे. त्यासाठी वेगवेगळे प्रसंग अधोरेखीत केलेले  आहेत. यात सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे कर्णाने आपल्या जन्मजात मिळालेल्या कवचकुंडलांचे इंद्राला केलेले दान. ज्या कवचकुंडलांमुळे कर्णाला अमरत्व प्राप्त झालेले असते.  ती तो इंद्र जेव्हा त्याच्या दारात याचक म्हणून येतो व  कवचकुंडलांचे दान मागतो तेव्हा तो क्षणाचाही विलंब न करता तो ते इंद्राला ते देतो. केवढा हा विलक्षण दानशूरपणा.

         शेवटी कर्ण व अर्जुनाचे घनघोर युद्ध  होते. ब्राम्हणाच्या शापामुळे कर्णाच्या रथाचे चाक धरणीमध्ये खचते. तो ते काढण्यासाठी रथाच्या खाली उतरतो. कर्ण हा रथाच्या खाली उतरलेला पाहून व त्याच्या हातात धन्युष्य नाही हे पाहून अर्जुनाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण अर्जुनास कर्णावर बाण सोडण्यास सांगतो. कर्ण हे पाहून " हा अधर्म आहे तू असे करू शकत नाहीस" असे सांगतो. तेव्हा श्रीकृष्ण त्यास म्हणतो " तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म". हे वाक्य आजही धर्म- अधर्म ची व्याख्या करतांना वापरले जाते. शेवटी अर्जुन कर्णावर बाण सोडतो. कर्ण धरणीवर कोसळतो व अखेर या सुर्यपुत्राचे प्राण मालवतात.

         युद्ध, द्रौपदी वस्त्रहरण, श्रीकृष्ण कर्ण वार्तालाप, कुंती कर्ण संवाद, द्रौपदी स्वयंवर, कवचकुंडलाचे दान, द्यूत क्रीडा असे काही प्रसंग लेखकाने असे काही रंगवले आहेत कि वाचक  त्यात गुंतून जातो.

         दानवीर कर्ण, अपमानित कर्ण, उपेक्षित कर्ण, सूर्याची आराधना करणारा कर्ण, आपल्या माता- पितावर  प्रेम  करणारा, मित्र धर्म पाळणारा कर्ण, धनुर्धारी कर्ण, आपली पत्नी वृषाली वर विलक्षण प्रेम करणारा कर्ण, आपला कनिष्ठ बंधू शोण ची काळजी घेणारा व त्याच्यावर माया करणारा कर्ण ह्या कर्णाच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा लेखकाने छानपणे आपल्या कादंबरीतून मांडल्या आहेत.
       कादंबरीचा शेवट कर्ण पत्नी वृषालीच्या सती जाण्याने होत असलातरी  वाचकाच्या मनात कर्णाच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे प्रतिबिबाचे कोंदण मात्र दीर्घकाळ राहते.
      लेखक श्री. शिवाजी सावंत आज आपल्यात नाहीत. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. साहित्यविश्वात  "मृत्युंजयकार" म्हणून त्यांची छबी कायम स्मरणात राहील. कर्णाचे चरित्र वाचकाच्या जीवनाच्या काही प्रसंगी मार्गदर्शक म्हणून भूमिका वठवू शकते

   

Comments

Popular posts from this blog