मशीनमय माणुस


माणुस आजकाल मशीनमध्येच फार गुंतलाय !!
त्याला कारणही तसेच आहे
कारण ,
मशीन द्वेष करत नाही
मशीन कुत्सित हसत नाही
ती टोमणेही मारत नाही
ती पुढे पुढे ही करत नाही

मशीन खाजगी प्रश्नात नाक खुपसत नाही
ती फार अपेक्षाही ठेवत नाही
तिला मानही  लागत नाही
 आणि तिला अपमानही कळत नाही

मशीन संपावर जात नाही
ती रजा हि मागत नाही
ती  पगारवाढही मागत नाही
 आणि ती प्रमोशनही मागत  नाही

मशीन कोणाच्या प्रेमात पडत नाही
ती कोणाशी मैत्रीही करत नाही
तीचे कोणाशी शत्रूत्व असत नाही
आणि तिचे कोणाशी ममत्वहि असत नाही

मशीन चिरीमिरी घेत-देत  नाही
मशीन भाऊबंदकी सांभाळत नाही
ती कोणाला लुबाडतही नाही
आणि ती कोणाला पिळतहि नाही

मशीन कोणाला छेडत नाही
ती स्त्री- पुरुष असा भेद करत नाही
ती जात-पात मानत नाही
आणि ती कोण गरीब कोण श्रीमंत हे जाणतही नाही

हे सर्व गुण-अवगुण माणसाचे
अजूनतरी नाही लागले ते
माणसानेच तयार केलेल्या मशीनला
म्हणून तर माणूस आज मशीनमध्येच फार गुंतलाय

© महेश भा. रायखेलकर






Comments

Popular posts from this blog