मानवी  इच्छा

परीक्षेत चांगले मार्क मिळावेत हि एक इच्छा !
उच्चं शिक्षणासाठी चांगले कॉलेज मिळावे हि एक इच्छा !
 चांगले करीअर घडावे  हि एक इच्छा !
मोठया पगाराची नोकरी मिळावी  हि एक इच्छा !
नोकरी-व्यवसायात उच्चं पदावर जावे हि एक इच्छा !
सुंदर-सुस्वभावी बायको मिळावी  हि एक इच्छा !
सुदृढ मुलं-बाळ व्हावीत हि एक इच्छा !
परदेशवारी व्हावी  हि एक इच्छा !
स्वतःचे घर असावे  हि एक इच्छा !
घरासमोर चार चाकी असावी  हि एक इच्छा !
हाताखाली नोकर-चाकर असावेत हि एक इच्छा !
घरात सर्व प्रकारची सुबत्ता असावी  हि एक इच्छा !
शरीर-प्रकृती उत्तम असावी हि एक इच्छा !
मनःशांती मिळावी  हि एक इच्छा !
कोर्ट-कचेरीची मागे झंझट नसावी हि एक इच्छा !
समाजात नाव लौकिक मिळवावा  हि एक इच्छा !
समाजसेवा हातून घडावी हि एक इच्छा !
प्रेमळ मित्रपरिवार असावा हि एक इच्छा !
आपुलकीची नाती-मंडळी  असावीत हि एक इच्छा !
मुलांनी शिकून मोठे व्हावे हि एक इच्छा !
भरपूर संपत्ती गाठी असावी हि एक इच्छा !
जावई-सून चांगली मिळावीत हि एक इच्छा !
नातवंड-पतवंड अंगा-खांद्या वर खेळवावीत हि एक इच्छा !
अध्यात्माची कास धरता यावी हि एक इच्छा !
मुलांनी म्हातारं पणी चांगले सांभाळावे हि एक इच्छा !
शेवटी चांगले मरण यावे हि एक इच्छा !
काही पूर्ण काही अपूर्णच  राहतात
मानवी जीवनातील इच्छा !
हीच तर नसेल ना परमेश्वराची   इच्छा ? !!

© महेश भा. रायखेलकर






Comments

Popular posts from this blog