बापू
बापू ! तुमचा 'अहिंसेचा' मंत्र आम्हाला रुचला नाही
पण हिंसेनंही कुठले प्रश्न सुटतील असे आता वाटत नाही !
बापू ! तुमचे 'खेडया कडे चला' हे म्हणणे आम्हाला पटले नाही
पण आता रोजच पहातोय शहराचे मरण अगतिक पणे !
बापू ! तुमची 'स्वदेशीची' चळवळ आम्हाला भावली नाही
पण आता विदेशी वस्तू वापरता वापरता आत्मादेखील गेलाय विदेशी होवून !
बापू ! तुमचा 'स्वच्छतेचा' वसा कधी आम्ही घेतलाच नाही
पण आता घाणीच्या साम्राज्यांत जीव जातोय गुदमरून
बापू ! तुमची 'साधी राहणी' आम्ही कधी अंगीकारलीच नाही
पण आता पटतंय फक्त उच्चं राहणीमानाने व्यक्तीमत्व खुलत नाही !
बापू! तुमचा 'स्वावलंबनाचा' मंत्र कधी आम्हाला आवडला नाही
पण आता समजून येतंय परावलंबनातल गुलामपणं !
बापू! हा देश 'बापूचा देश' म्हणून जगात ओळखला जातोय
पण आम्ही करंटे मात्र फक्त तुम्हाला नोटांमध्येच पहातोय!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment