मरण झालंय स्वस्त 

कोणी पुरात वाहून जातो
कोणी गर्दीत चेंगरून मरतो
कोणी आगीच्या भक्षस्थानी पडतो
तर कोणी सेल्फीच्या नादाने जातो
कारण बाकी सगळं चाललंय मस्त
फक्त मरण झालंय स्वस्त !

कोणी रस्ते अपघातात ठार होतो
कोणी ब्लुव्हेल सारख्या गेम मध्ये संपतो
कोणी कुपोषणाने मिटतो
तर कोणी प्राण वायूच्या कमतरतेमुळे  जातो
कारण बाकी सगळं चाललंय मस्त
फक्त मरण झालंय स्वस्त !

कोणी निराश झाल्याने आत्महत्या करतो
कोणी कर्जबाजारीमुळे स्वतः ला संपवतो
कोणाचा व्यसनामुळे अंत होतो
तर कोणी अन्नातून विषबाधेमुळे जातो
कारण बाकी सगळं चाललंय मस्त
फक्त मरण झालंय स्वस्त !

किड्यामुंग्या एवढी झालीयं माणसाच्या जीवाची किंमत
ना  कसला खेद ना कसली खंत
काहींचे अपघात , व्यवस्थेमूळे मरण
कांही रचती स्वतःच्या हाताने स्वतःचे सरण

© महेश भा. रायखेलकर








Comments

Popular posts from this blog