खरं सुख 

मोठा बंगला नसला  तरी चालेल
 घराला घरपणं असलं  पाहिजे

मुलं उच्चं    नाही शिकली  तरी चालेल
 चांगला माणुस बनली पाहिजे

दारात  चार चाकी नसली तरी चालेल
 रात्री झोप  शांत लागली पाहिजे
बायको सुंदर नसली तरी चालेल
मनाने सुंदर  असली पाहिजे

जावई गर्भश्रीमंत नसला तरी चालेल
 निर्व्यसनी  तो असला  पाहिजे

सून श्रीमंताची  नसली तरी चालेल
 संस्कारी  ती असली पाहिजे

गाठी मालमत्ता  नसली  तरी चालेल
 अंगी नीतिमत्ता  असली पाहिजे

श्रीमंत झालोत  नाहीत तरी चालेल
 शरीर उत्तम राहिलं   पाहिजे

ओळखी खूप  नसल्या तरी चालेल
चार जीवंलग  मित्र  असली  पाहिजे

मोठा गोतावळा नसला तरी चालेल
काही आपुलकीची नाती जोडली   पाहिजे

शेवटी जास्त काही कमवलं नाही तरी चालेल
मनाला शांती    लाभली पाहिजे

© महेश भा. रायखेलकर


Comments

Popular posts from this blog