राहून गेलं 


कोणाला भेटावस वाटतं
भेटून या
परत वाटायला नको
राहून गेलं!

कोणावर प्रेम व्यक्त करायचं
करून घ्या
परत वाटायला नको
राहून गेलं!


कोणा गावाला जायचंय
जावून या
परत वाटायला नको
राहून गेलं!

एकाधी वस्तू खरेदी करायचीय 
करून घ्या 
परत वाटायला नको
राहून गेलं!

एकाधी कला शिकायचीय 
शिकून घ्या 
परत वाटायला नको
राहून गेलं!

एकाधा पदार्थ खावासा वाटतोय 
खाऊन घ्या 
परत वाटायला नको
राहून गेलं!

एकाधी स्टाईल करावीशी वाटते 
करून घ्या 
परत वाटायला नको
राहून गेलं!

एकाध्याला गिफ्ट द्यावीशी वाटते
देवून टाका
परत वाटायला नको
राहून गेलं!

एकाधा छंद जोपासावा वाटतो 
जोपासा 
परत वाटायला नको
राहून गेलं!

एकाधा खेळ खेळावा वाटतो
खेळुन घ्या
परत वाटायला नको
राहून गेलं!

हे राहून गेलं ते राहून गेलं
असं म्हणता म्हणता
कधी असं वाटायला नको
अरे जगणंच
राहून गेलं !
जगणंच
राहून गेलं !!


© महेश भा. रायखेलकर





Comments

Popular posts from this blog