Posts

Showing posts from 2022
Image
डायरीतील बारा पाने मी मागील काही वर्षापासून पुढील वर्षातील कामाचे नियोजन काही संकल्प वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका डायरीत लिहून ठेवतो . यात कौटूंबीक , वैयक्तिक,   व्यवसायीक , आर्थिक , खरेदी अशी वर्गवारी केलेली असते . दर महिन्यात यावर नजर टाकून व त्या त्या महिन्याची कामाची यादी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तयार करतो ज्यात आधी नियोजन केलेल्या काही गोष्टीचा समावेश केलेला असतो . यावर्षी यात अजून एक गोष्ट जमा केली ती म्हणजे त्या त्या महिन्याच्या कामाच्या यादीच्या मागच्या बाजूला   त्या महिन्यात कोणती कामे झाली , काही विशेष घटना हे बाराही महिने लिहीत गेलो आणि आता वर्षीच्या शेवटी जेव्हा हि डायरी मी वाचतोय तेव्हा एक एक घटनेचा पदर माझ्या समोरून सरकत जातोय . लहान लहान गोष्टीची जसे कि हुरडा पार्टी असेल , वाढदिवस साजरा करणे असेल , एखादा लेख पेपर मध्ये छापून आलेला असेल , एखादी ट्रिप केलीली असेल , एखाद्या कवी संमेलनात भाग घेतला असेल , मुलाने एकाद्या स्पर्धेमध्ये भाग ...
Image
स्वतःला शाबासकी द्या कौतुकाने माणूस सुखावतो. एखादी गोष्ट साध्य केली तर कोणी तरी आपली प्रशंसा करावी, शाबासकी द्यावी, कौतुक करावं असं वाटणं हे स्वाभाविकच . पण यासाठी सर्वस्वी दुस-यावरच अवलंबून राहणे हे मात्र चुकीचे आहे. एखादी मोठी कामगीरी साध्य केली तर इतरांकडून कौतुक, शाबासकीचा वर्षाव होईलही.  परंतु रोजच्या जगण्यामध्ये आपण काहींना काही साध्य करत असतो.  काहीतरी लहानसं काम साध्य केलेले असतं तेव्हा आपण स्वतःला शाबासकी देतो का ? याचे उत्तर कदाचित नाही असेच असेल. कौतुक, शाबासकी, प्रशंसा हि इतरांनीच आपल्या बाबतीत करायची असते अशी आपली एक चुकीची धारणा आहे.   आजच्या जलद गतीच्या जगण्यामध्ये तुमच्या लहान सहान साध्य केलेल्या गोष्टीचं  इतरांकडून कौतुक होईल हि अपेक्षाच चुकीची आहे. मग काय करायचं तर स्वतः च स्वतः ला शाबासकी द्यायची कारण तुम्ही साध्य केलीली कामगिरी जसं कि खूप दिवसापासून रखडलेलं  असलेलं सरकारी काम पूर्ण होणे,  अनेक काम एकाच दिवसात पूर्ण करणे, तुम्ही लावलेला झाडाला फुलं येणे, पहिल्यादांच बनवलेला पदार्ध चांगला होणे, एखाद...
Image
यांच्यातील उर्जेला सलाम अमिताभ बच्चन वय वर्ष ८० अजूनही तरुणाला लाजवेल अश्या जोशात काम करतात  .  कोठेही आपले म्हातारपण ते मिरवत नाहीत. गेली पाच दशके आपल्या अभिनयाने त्यांनी मोठा व छोटा पडदा  गाजविला व आजही 'केबीसी' च्या माध्यमातून व नुकताच आलेल्या 'उंचाई'  या चित्रपटातून  त्याच  उ र्जेने त्यांनी काम केले आहे, करत आहेत . जीवनात आलेल्या चढ-उताराला सामोरे जात, शारीरिक व्याधीवर मात करत , जीवघेण्या अपघातातून बरे होत, आर्थिक दिवाळखोरीला सामोरे जात , फिल्म इंडस्ट्री मधील नवनवीन  तंत्र ,गोष्टी शिकत, नवीन सहकलाकारांसोबत स्वतःला जुळवत काम करणे सोपी गोष्ट नव्हे. आजच्या पिढीला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आशा भोसले वय वर्ष ८९ आजही त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. रिऍलिटी शो मध्ये जाणे, तरुण गायक कलाकारांना मार्गदर्शन करणे , प्रसंगी गाणे त्याच जोमात चालू आहे. स्वर्गीय गाण कोकिळा लता मंगेशकर यांच्या सोबतच आशा भोसले यांची देखील गायन क्षेत्रात वेगळी ओळख आहे. आशा  भोसले यांची गाण्यातील विविधता अलौकिक. आपल्या खाजगी आयुष्यातील कटू प्रसंगाला सामोरे...
Image
  कर्तृत्वाने सुंदर दिसूया प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर  असावं, दिसावं. विशेषतः तरुण मुलां-मुलींना. त्यातल्या त्यात  जास्त  मुलींना . यात वावगं असे काहीही नाही. हि एक तारुण्यसुलभ  भावना आहे. आजच्या चकाचौधच्या  दुनियेमध्ये बाह्य सौदर्यांस जरा जास्तच महत्व आलेले आहे. बाजारात अनेक सौदर्यं साधने आहेत . ते बनवणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय तेजीत आहे. पण  प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे शारीरिक सौदर्यां मध्ये माझे असे कोणते कर्तृत्व  आहे. फार तर आई वडील सुंदर असतील तर त्यांची मुलं सुंदर  जन्माला येतील,  तेही शरीराने कर्तृत्वाने नाही. कोणाच्या पोटी  जन्माला यावे हे माणसाच्या हातात नाही तर जन्माने मिळालेला सौदर्यांचा अभिमान व गर्व बाळगणे कितपद योग्य आहे. इथे सुंदर दिसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्धल कोणताही आकस  व राग नाही. फक्त शारिरीक सौदर्यां पुरती व्यक्तीने मर्यादित राहु नये एवढेच. कारण शारिरीक सौदर्यं चिरकाल टिकणारे नाही . काळाच्या ओघात त्याला कधी ना कधी उतरती कळा लागणारच. मग चिरकाल काय उरतं ?  ते कर्तृत्वाचे सौदर्यं . तरुण मुल-मुली ...
Image
                                          स्पर्धेचा सकारात्मक     विचार  आवश्यक  सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात स्पर्धेचा सकारात्मक विचार करणे गरजेचे झाले आहे . तसे पाहिले तर कोणत्याही प्रकारची स्पर्धा अस्तित्वात नाही. हा एक आपण केलेला विचार आहे, जोकि आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण करत असतो. आपण नेहमी इतरांशी तुलना करत असतो . त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो . पण आपण या जगात इतरांशी तुलना करण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत. जर स्पर्धा करावयाची असेल तर स्वतःशी करा. विचार करा की आधी मी काय होतो आणि आता काय आहे. नक्कीच तुम्ही काही मिळविले असेल. आधी तुम्ही नोकरी करत असाल आता तुम्ही नोकरी देणारे झाले असाल . आधी तुम्ही कोणावर अवलंबून असाल आता कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असेल. आधी तुम्ही घेणारे असाल आता देणारे झाले असाल. आधीपेक्षा तुमच्या विचारांचा , बुद्धीचा , अनुभवांचा विकास झालेला असेल. तेव्हा स्पर्धा  कोठे आहे ?  आजही सर्वत...
Image
                                                                                                            विचारांचे सीमोल्लंघन करूयात  आज  'दसरा' म्हणजेच विजयादशमी . 'दसरा सण मोठा नाही  आनंदाला तोटा ' असे आपण म्हणतो . खरंच  आहे या दिवशी सर्वत्र उत्साहाचे , प्रसन्न  वातावरण असते.  नवीन कपडे,  वस्तूंची खरेदी केली जाते. याच दिवशी शस्त्र पूजनही केले जाते . रामाचे  रावणावरील विजयाचे प्रतीक म्हणून रावणाचे दहन या दिवशी केले जाते.   या दिवशी सीमोल्लंघनला महत्व  आहे. . सीमोल्लंघन म्हणजे याच दिवसी आधीच्या काळात शत्रूवर विजय मिळविण्यासाठी राज्याचा सीमा पार करून प्रस्थान केले जायचे. नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो...
Image
                               गुणांची  उजळणी करूया    एक व्यक्ती अनेकांशी जोडला गेलेला असतो. मित्र, नातेवाईक, शेजारी, सहकारी अश्या वेगवेगळ्या नात्यात तो गुंफलेला असतो.  यांच्याशीच रोजचे व्यवहार तो करत असतो. त्याच्या संबंधित कोणताच माणूस हा परिपूर्ण नसतो. त्यात काही अवगुण असतातच. एक व्यक्ती म्हणून आपण दुसऱ्यांच्या अवगुणावर  सहज बोट ठेवतो . 'हा रागीटच  आहे' . 'तो  गर्वीष्ठच आहे'. 'तमका गबाळाच'.  'हा सतत चेष्टाच करतो'  अशी अनेक नावे आपण ठेवत असतो.  प्रत्येक माणूस हा  परिपूर्ण नाही हे खरे असले तरी त्यात आपल्याला  घेण्यासारखा एकही गुण नाही असे कधीच होत नाही. पण आपण अवगुणांची बाराखडी वाचण्यात एवढे तल्लीन झालेले असतो की त्या व्यक्तींमध्ये असलेल्या गुणांची  दखल आपण घेतसुद्धा नाही , मग ते गुण आपल्यात उतरविणे तर दूरचीच  गोष्ट . एखादा व्यक्ती गर्वीष्ठ असेल तर तोच व्यक्ती टापटीप असेल, कर्तव्यात चोख असेल. एखादा व्यक्ती गबाळा अ...
Image
    माणसाचं असंच असतं   नोकरी करणाऱ्याला बिझनेस करणारा सुखी वाटतो  बिझनेस करणाऱ्याला नोकरी  करणारा सुखी वाटतो  माणसाचं  हे  असंच असतं  आहे त्यात त्याच कधीच समाधान नसतं  बॅचलर माणसाला लग्न केलेला सुखी वाटतो  लग्न  केलेल्या माणसाला बॅचलर सुखी  वाटतो  माणसाचं  हे  असंच असतं  आहे त्यात त्याच कधीच समाधान नसतं  खेड्यात राहणाऱ्याला शहरातला सुखी  वाटतो  शहरातल्याला खेड्यात राहणारा सुखी  वाटतो  माणसाचं  हे  असंच असतं  आहे त्यात त्याच कधीच समाधान नसतं  फ्लॅट मध्ये राहणाऱ्याला बंगल्यातला माणूस सुखी वाटतो  बंगल्यातला माणसाला फ्लॅटवाला सुखी  वाटतो  माणसाचं  हे  असंच असतं  आहे त्यात त्याच कधीच समाधान नसतं  परदेशात शटल झालेल्याला देशात राहणारा  सुखी वाटतो  देशात  राहणाऱ्याला  परदेशात शटल झालेला सुखी वाटतो  माणसाचं  हे  असंच असतं  आहे त्यात त्याच कधीच ...
Image
                             पुस्तक परिचय  पुस्तक     'क्षितिजापलीकडे' ( आत्मचरित्र) लेखक :  प्रा. ए. डी.  जोशी सर  (  सोलापुरातील प्रसिद्ध आय. एम. एस .  शिक्षण संस्थेचे संस्थापक , जेष्ठ शिक्षण तज्ञ , कवी , काव्यप्रेमी शिक्षक मंच सल्लागार ) पुस्तकाची सुरुवात सरांच्या  पत्नीच्या दुर्धर आजाराच्या माहितीने होते आणि नंतर त्यांचा  जीवनपट फ्लॅशबॅक स्वरूपात वाचकाच्या  समोर येतो. खडतर असलेले सरांचे   बालपण, शिक्षणाविषयी असलेली सरांची   गोडी, पडेल ते काम करून  घेतलेले शिक्षण सर्वकाही विलक्षण व प्रेरणादायी. सरांनी  परिस्थितीपुढे न झुकता त्यावर मात करून यश संपादन केलं हि चिकाटी, जिद्द आजच्या  पिढीला मार्गदर्शक. भिक्षुकाचा मुलगा तो  एक नावाजलेल्या शिक्षण संस्थेचा संस्थापक हा सरांचा   प्रवास, त्यातील आलेले  अडथळे व त्यावर  काढलेले तोडगे सर्वच उल्लेखनीय. सरांच्या जीवनपटात...
Image
  माणूस आहे मी मीही कधी कधी कंटाळतो  कंटाळणाराच ना  माणूस आहे मी  मशीन थोड़ी आहे  मीही कधी कधी चिडतो  चिडणाऱच ना  माणूस आहे मी  मशीन थोड़ी आहे  मीही कधीतरी  दुखावतो  दुखावणारच ना  माणूस आहे मी  मशीन थोड़ी आहे  माझ्याही  काही थॊड्या  अपेक्षा असतात असणारच ना  माणूस आहे मी  मशीन थोड़ी आहे  मीही कधी कधी  निराश होतो  हॊणारच ना  माणूस आहे मी  मशीन थोड़ी आहे  मीही कधी कधी रोमांचित होतो  हॊणारच ना  माणूस आहे मी  मशीन थोड़ी आहे  मीही कधीतरी चुकतो  चुकणारच ना  माणूस आहे मी  मशीन थोड़ी आहे  माझेही कौतुक कधी व्हावेसे वाटते  वाटणारच ना  माणूस आहे मी  मशीन थोड़ी आहे  मशीन थोड़ी आहे  (महेश भा. रायखेलकर)