माणसाचं असंच असतं  


नोकरी करणाऱ्याला बिझनेस करणारा सुखी वाटतो 
बिझनेस करणाऱ्याला नोकरी  करणारा सुखी वाटतो 
माणसाचं  हे  असंच असतं 
आहे त्यात त्याच कधीच समाधान नसतं 

बॅचलर माणसाला लग्न केलेला सुखी वाटतो 
लग्न  केलेल्या माणसाला बॅचलर सुखी  वाटतो 
माणसाचं  हे  असंच असतं 
आहे त्यात त्याच कधीच समाधान नसतं 

खेड्यात राहणाऱ्याला शहरातला सुखी  वाटतो 
शहरातल्याला खेड्यात राहणारा सुखी  वाटतो 
माणसाचं  हे  असंच असतं 
आहे त्यात त्याच कधीच समाधान नसतं 

फ्लॅट मध्ये राहणाऱ्याला बंगल्यातला माणूस सुखी वाटतो 
बंगल्यातला माणसाला फ्लॅटवाला सुखी  वाटतो 
माणसाचं  हे  असंच असतं 
आहे त्यात त्याच कधीच समाधान नसतं 

परदेशात शटल झालेल्याला देशात राहणारा  सुखी वाटतो 
देशात  राहणाऱ्याला  परदेशात शटल झालेला सुखी वाटतो 
माणसाचं  हे  असंच असतं 
आहे त्यात त्याच कधीच समाधान नसतं 

इंजिनियर झालेल्याला डॉक्टर सुखी वाटतो 
डॉक्टर  झालेल्याला इंजिनियर सुखी वाटतो 
माणसाचं  हे  असंच असतं 
आहे त्यात त्याच कधीच समाधान नसतं 

(महेश भा. रायखेलकर)




Comments

Popular posts from this blog