अच्छे दिन

आम्ही सार्वजनिक वस्तू घरी चोरून नेणार
आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

 आम्ही तंबाकू,गुटका खाऊन जागोजागी थुकंणार
आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

आम्ही कचरा कोठेही टाकणार 
आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

 आम्ही कोणत्याही कामासाठी चिरीमिरी घेणार-  देणार
 आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

आम्ही वाहतुकीचे नियम तोडून वाहने चालवणार 
आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

 आम्ही सार्वजनिक ठिकाणावर काहीही अभद्र लिहून ठेवणार 
  आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

आम्ही ऐपत असतांना  अनुदान नाही सोडणार
आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

   आम्ही गरिबीचं सॉंग घेवून योजनेचा लाभ घेणार 
    आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

आम्ही पाणी,वीज, अन्नाची नासाडी करणार 
आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

  आम्ही थोडक्या-थोडक्या गोष्टी वरून कायदा हातात घेणार 
   आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

आम्ही हवा,जल,ध्वनी चे प्रदूषण करणार
आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

   आम्ही कर चुकवण्याचा खटाटोप करणार
  आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

आम्ही साठेमारी करून गरिबांना लुबाडणार
आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

आम्ही जाती-पातीच्या भिंती उभारणार
आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

आम्ही महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण नाही करणार
आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

आम्ही उघड्यावरच मल-मूत्र विसर्जित करणार
 आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?

'अच्छे दिन' ,'अच्छे दिन' तेव्हाच येणार
जेव्हा सरकारसोबत जनताही त्यासाठी झटणार!
जेव्हा सरकारसोबत जनताही त्यासाठी झटणार !!

© महेश भा. रायखेलकर 





Comments

Popular posts from this blog