जिच्या हाती पाळण्याची दोरी
कौसल्या व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असेल एकवचनी राम !
यशोदा व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असेल गीता सांगणारा श्रीकृष्ण !
कुंती व्हावं लागेल तुला
जर घडवायचे असतील धनुर्धारी अर्जुन,महापराक्रमी भीम आणि धर्मराज युधिष्टिर !
राधा व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असेल दानशूर कर्ण !
जिजाऊ व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असेल जाणता राजा शिवाजी !
भीमाबाई व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असतील क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर !
भुवनेश्वरी देवी व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असतील स्वामी विवेकानंद !
धन्य धन्य त्या माता
ज्यांनी घडविले अनेक महापुरुषांना
कौसल्या व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असेल एकवचनी राम !
यशोदा व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असेल गीता सांगणारा श्रीकृष्ण !
कुंती व्हावं लागेल तुला
जर घडवायचे असतील धनुर्धारी अर्जुन,महापराक्रमी भीम आणि धर्मराज युधिष्टिर !
राधा व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असेल दानशूर कर्ण !
जिजाऊ व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असेल जाणता राजा शिवाजी !
भीमाबाई व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असतील क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर !
भुवनेश्वरी देवी व्हावं लागेल तुला
जर घडवायचा असतील स्वामी विवेकानंद !
आशिमा व्हावं लागेल तुला
जर घडवायचे असतील विज्ञाननिष्ठ डॉ. अब्दुल कलामधन्य धन्य त्या माता
ज्यांनी घडविले अनेक महापुरुषांना
ऊठ ,जागी हो, डोळे उघडून पहा
तुझ्याच हाती आहे उद्याच्या जगाचे भवितव्य ... !
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment