सुट्टी 

मला लागली उन्हाळ्याची सुट्टी
अभ्यासाची आता माझी कट्टी
सकाळी आता उशीरा मी उठणार
शाळेला जायची गडबड मागे  नसणार

दिवसभर  मित्रांसोबत मी  खेळेन
अधूनमधून कार्टून पहात मी  बसेन  
आई मला छानसे आईस्क्रीम करून देईन
                                                                             ऊसाचा मस्त थंडगार रस मी पिईन
आई-बाबांसोबत ट्रीपला मी जाईन
हॉटेलात आवडीची डिश मी  खाईन
आवडीचा  पिक्चर टॉकीज मध्ये  मी बघेल
बाबांसोबत टँकवर जाऊन पोहायला मी शिकेल

जमल्यास छंद वर्गाला मी जाईल
नवीन एखादी गोष्ट शिकून मी घेईल
आंब्याच्या रसावर ताव मी मारील
छान छान गोष्टी आबा मला सांगतील

१ मे ला माझा  परीक्षेचा निकाल लागणार
अभ्यास केला होता म्हणजे मार्क चांगलेच पडणार
रिपोर्ट कार्ड पाहून आई-बाबा   खुष होणार
एखादी छानशी गिफ्ट मला ते घेऊन देणार

मला वाटते ही सुट्टी कधीच संपू नये
शाळे-बिळेंची खरंतर भानगडच असू नये
पण त्या शिवाय शिकून मोठा कसा मी  होणार
मोठेपणी पायलट होऊन विमान कसे चालवणार

एक मात्र आहे शाळेतील मित्र नाही भेटणार
त्यांची मला सदाच सुट्टीत आठवण येणार
कधीतरी संपेलचना हि उन्हाळ्याची सुट्टी
त्यांची अन माझी  आहेच  मग वर्षभर चांगली भट्टी


© महेश भा. रायखेलकर










Comments

Popular posts from this blog