असेही कधीतरी व्हावे 

असेही कधीतरी व्हावे
तू अलगद माझ्या मिठीत शिरावे
असेही कधीतरी व्हावे

असेही कधीतरी व्हावे
पावसात चिंब  दोघांनी भिजावे
असेही कधीतरी व्हावे

असेही कधीतरी व्हावे
हातात हात गुंफूनि फिरावे
असेही कधीतरी व्हावे

असेही कधीतरी व्हावं
डोळ्यांनी एकमेकांना प्यावे
असेही कधीतरी व्हावे

असेही कधीतरी व्हावं
मी तूला हळूच चुंबावे
असेही कधीतरी व्हावे

असेही कधीतरी व्हावे
आपण  एकमेकांना ओळखावे
असंही कधीतरी व्हावे

असेही कधीतरी व्हावे
मनीचे हितगुज करावे
असेही कधीतरी व्हावे

असेही कधीतरी व्हावे
सुख दुःख वाटुनि घ्यावे 
असेही कधीतरी व्हावे

असेही कधीतरी व्हावे
दोन  जीव  मन एक व्हावे
असेही कधीतरी व्हावे

असेही कधीतरी व्हावे
जन्मोजन्मीचे नाते जुळावे
असेही कधीतरी व्हावे
असेही कधीतरी व्हावे


© महेश भा. रायखेलकर


Comments

Popular posts from this blog