असं कधी होत  का 

अमावस्याच्या भीतीने 
पौर्णिमेचा चंद्र पाहण्याचं 
कोणी सोडतं का ? 

निर्माल्यचं होणार म्हणून
फुल फुलायचं  
कधी थांबतं  का ?

प्रेमभंग होईल म्हणून 
प्रेमात पडायचं 
कोणी टाळतं का ?

पानगळीच्या भीतीने 
झाड बहरण्याचं 
कधी थांबवत का ?

हरण्याच्या भीतीने 
खेळ खेळायचं 
कोणी सोडतं का ?

अस्त होणार म्हणून
सूर्य उगवायचा 
कधी थांबतो का ?

स्वप्नभंग होईल म्हणून 
स्वप्न पाहण्याचं  
कोणी थांबवत का ?

रात्र होणार म्हणून 
दिवस उजडायचा 
कधी रहातो का ?

अपयशाच्या भीतीने 
कोणी प्रयत्न करण्याचं  
 कधी सोडतं  का ?

कापणीच्या भीतीने 
कोणतं पीक उगवायचं 
कधी राहतं का ?

शेवटी मरणाच्या भीतीने 
जीवन जगण्याचं 
कोणी  सोडतं का ?

© महेश भा. रायखेलकर 


Comments

Popular posts from this blog