काही हायकू

प्राणी माणसांपेक्षा
प्रामाणिक असतात
दगा न देतात
                                                     *************
आई बापाची सेवा करणे
हेच एक पुण्य
बाकी गोष्टी  नगण्य
*****************
तिन्ही सांजेला
अशी रडू नकोस
चल डोळे पूस
***************
तुझे हात
माझ्या हातात गुंफले
जगणे सुरु झाले
****************
पहा अशी
माझ्या डोळ्यात
तुझ्यासोबतचा एकांत
*****************
तू गेलीस विसरुनी
सा-या माझ्या सोबतच्या
गोड  आठवणी
***************
तेच तेच
किती वेळा सांगतेस
तू माझ्या प्रेमात आहेस
**************
 पुण्य कमवावे
लागते तर
पाप हातून होते
*************
 तुझे पत्र
वाचतो आहे
प्रेमाचे तंत्र
***********
तीच तू
जिने दगा दिला
मला संपविला
***********

© महेश भा. रायखेलकर


Comments

Popular posts from this blog