माझ्या हायकू कविता

आपली माणसं
जेव्हा आपलेपणा ठेवत नाहीत
तेव्हा होतो त्रास
                                                                ******************
आयुष्य कसे जगावे
हे उशिरा कळते
चाळीशी उलटलेली असते
******************
चांगले पेरा
चांगलेच उगवेल
वाईटावर उतारा
***************
नको अशी
नादी तू लावू
सभ्यपणावर चढे बुरशी
***************
दिल्या घरी
तू सुखी रहा
तुझे तू पहा
***************
या वयात
शोभतं का?
मन कधी म्हातारं होतं का?
*****************
म्हातारं पण सगळ्यांनाच येतं
तरुणपण सरतं
परत बालपण येतं
******************
तुझ्या नजरेचा बाण
गेला आरपार
उघड प्रेमाचं तू दार
******************
तुझं हसणं
चांदणं बरसणं
मला हरवून जाणं
****************
जन्माला आलेला
कधीतरी मरणारचं
श्रुष्टीचा नियम कडक फारचं
*******************


© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog