काही हायकू


राजकारणी लोक
झालेत निब्बर
देतात काहीही उत्तर
=============

लोक कोणत्याही
 गोष्टीला नावे ठेवतात
स्वतः निवांत
================
तुझ्या मागे
कोण लागतो
वेळ नसतो
===============
मी दिली
आज मुलाखत
एका मिनिटात
==============
मुलगी पाहायला
मी गेलो
प्रेमात पडलो
==============
आज झाला
तिचा साखरपुडा
मी वेडा
==============
मी चुकीचे
समजत होतो
परिणाम प्रेमाचे
==============
तुझा पत्त्ता
आहे कोठे
माझी सत्ता
=============
देव करो
तुझे भले
काय झाले
=============
मीच तुला
बरं सापडलो
प्रेमात  पडायला
==============


© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog