मरावे परी देहरूपी कामी यावे

जीवंतपणी माणसाचे आपल्या देहावर अतोनात प्रेम असते. तो त्यास सजवतो, त्याची हरप्रकारे काळजी घेतो व तसेच त्याचे सर्वप्रकारचे चोचले जन्मभर पुरवित असतो. असे करणे हा माणसाचा नैसर्गिक स्थायी स्वभाव आहे. परंतू मॄत्यूनंतरही माणसाची आपल्या देहावरील आसक्ती सूटत नाही. मॄत्यूनंतर परंपरेनूसार आपल्या देहावर विधी होवून त्याची उत्तरक्रिया करावी अशी त्याची इच्छा असते. कारण तो रूढी, परंपरा, आसक्ती, मोक्ष देहावर असलेले त्याचे प्रेम या जोखडातून मुक्त होण्यास तो तयार नसतो. जरी जीवंतपणी कोणी मरणोत्तर ‘देहदानाचा’ निर्णय घेतला तरी त्याचे कुटुंबिय , नातेवार्इक त्यास त्याच्या या निर्णयापासून परावॄत्त करण्याचा प्रयत्न करतात. कारण फार कमी लोकांकडे वैज्ञानिदॄष्टीकोन असतो व रूढी,परंपराच्या चक्रव्युहाला भेदण्याचे धाडस असते. परंतू काही व्यक्ती यास अपवाद असतात व त्यात एक म्हणजे माझ्या आत्येसासूबार्इ स्व.सौ. लिला गोपाळ वागदरीकर हया होत.
सौ. लिला वागदरीकर यांनी अनेक वर्ष वाडीया हास्पिटल मध्ये परिचारिका म्हणून उत्तमरीत्या काम पाहीले होते. वैदयकीय क्षेत्र त्यांना परिचित होते व त्या क्षेत्राबद्द्ल त्यांच्या मनात जिव्हाळा होता. नातेवार्इंकामध्ये कोणीही आजारी असेल, हॉस्पिटल मध्ये अ^डमीट असेल तर त्या धावून त्यांच्याकडे जात व त्यांना धीर देत. तसेच कोणाच्या बाळतपणात त्या घरी जावून राहणे व ते सुखरूपपणे पार पडेपर्यंत हरप्रकारची मदत करणे यात त्यांचा हातखंडा होता. नुसतेच वैदयकीय कारण नाही तर कोणाही नातेवार्इकाकडे लग्न, मुंज, वास्तूशांती व इतर धार्मिक कार्य त्यांच्या मदतीशिवाय पार पडलेले मला आठवत नाही. ‘जीथे कमी तेथे मी’ हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. टापटीपपणा, वक्तशीरपणा, स्वच्छता, श्स्तिीसाठी प्रसंगी कठोर होणे असे गुण त्यांच्या अंगी होते. जन्मभर त्या कोणाला ना कोणाला मदत करत राहिल्या. सेवाभाव त्यांनी आपल्या जीवनात रूजविला होता. आयुष्यभर तर त्या दुर्सयाच्या कामी आल्याच परंतू मॄत्यूनंतरही ‘देहदान’ करून कामी येण्याची वॄत्ती त्यांनी सोडली नाही.
दोन वर्षापूर्वी माझ्या ऑफिसजवळ असलेल्या त्यांच्या समर्थांच्या बैठकीनंतर त्या माझ्याकडे आल्या व म्हणाल्या “महेशराव (मी त्यांचा जावर्इ असल्याकारणाने त्या याच नावाने मला संबोधत) माझे तुमच्या कडे एक महत्वाचे काम आहे “ मी म्हणालो “काय ? ”. त्या म्हणाल्या “परंतू तुम्ही ते करणार असाल तरच ते मी तुम्हाला सांगते”. मी थोड थांबून म्हणालो “सांगा तरी ,माझ्याकडून होण्यासारखे असेल तर ते मी नक्की करेन”. त्या म्हणाल्या “मला देहदानाचा फा^र्म भरावयाचा आहे तर तो कोठेे मिळातो याची चौकशी करून तो मला आणून दया”. मी आश्चर्यचकीत होवून म्हणालो “आत्याबार्इ असा विचार तुम्ही का करता?. आम्हाला तुम्ही हव्या आहात तुम्ही शंभर वर्षापर्यंत जगलं पाहीजे “.त्यावर त्या हसून म्हणाल्या “नाही हो ! शरीर आता थकलंय कधीही बोलावणं येवू शकते, माझी देहदान करण्याची इच्छा आहे त्यासाठीचा फॉर्म तुम्ही घेवून या”. मी “ठीक आहे! “ म्हणालो. मी ही गोष्ट कामाच्या व्यस्ततेत साफ विसरूनही गेलो व तसेच ते त्यांच्या ‘देहदानाच्या’ त्यांच्या निर्णयापासून परावॄत्त होतील असा माझा कयास होता. परंतू माझा हा कयास त्यांनी काही दिवसातच खोटा ठरवला. एक दिवशी त्यांची बैठक संपल्यानंतर परत त्या माझ्या ऑफिसला आल्या. यावेळस त्यांनी देहदानाचा फॉर्मच सोबत आणला होता. या कामी त्यांना देहदान चळवळ चे श्री. दुमालदार काका यांनी मदत केली होती. आता ते त्या फॉर्मवर असलेल्या जवळ च्या नातेवार्इंकांच्या संमतीसाठी च्या सही साठी माझी सही मागत होत्या. मला लक्षात आले की त्या त्यांच्या ‘देहदानाचा’ निर्णयावर ठाम आहेत. मी त्या फॉर्म वर सही केली. त्या हसून ‘थ^क्यू’ म्हणाल्या. वैदयकीय क्षेत्राबद्द्ल असलेली त्यांची आस्था व सद्गुरू अधिष्ठानावर त्यांची असलेली अपार श्रध्दा यामूळे एवढा मोठा निर्णय त्या घेवू शकल्या असे मला वाटते.
थोडया दिवसापूर्वीच त्या ‘माघवारी’ निमीत्त गाणगापूरला गेल्या होत्या. र्बयाच वर्षापासून त्या नियमीत वारीला जात. तत्पूर्वी ते त्यांचे फॅमिली डॉक्टर डॉ. महेंद्र जोशी यांच्याकडे प्रकॄती तपासण्यासाठी गेल्या. तपासणी झाल्यानंतर “मला वारीला जायचंय तर तुम्ही या साठी मला परवानगी दया” असे त्या डॉक्टररांना म्हणाल्या डॉक्टरांनी त्यांना सांगीतले “तूमची सध्याची तब्येत दगदग करण्यासारखी नाही तरी तूम्ही जावू नका”. परंतू वारीत खंड पडता कामा नये व परम दत्तभक्त असल्याकारणाने त्या वारीसाठी गेल्या. जातांना फोनवरून ‘मी वारी साठी जात आहे’ व कोणत्या दिवशी त्या परत येणार आहे याची त्यांनी मला कल्पना दिली. वारी करून त्या परत आल्या परंतू त्यांची तब्येत ठासळली. हिमोग्लोबीन कमी झाल्याकारणाने डॉक्टररांनी त्यांना ५ दिवसाचा आयर्न चा डोस देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पहिला डोस व्यवस्थीत पार पडला. परंतू दुर्सयादिवशी म्हणजे दि २१. ०२ २०१७ रोजी डोस देतांनाच त्यांना तीव्र हदयविकाराचा झटका येवून त्यातच त्यांचे दु:खद निधन झाले. त्या आम्हाला कायमच्या सोडून गेल्या. मॄत्यूनंतर त्यांचा देह त्यांच्या संकल्पानूसार अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर, सोलापूर यांना वैदयकिय शिक्षण व संसोधनाच्या उपयुक्त कामाकरिता दान करण्यात आला. त्यांची ‘देहदानाची’ इच्छा पूर्ण झाली. या कामी अश्विनी मेडिकल कॉलेज चे आम्हाला मोलाचे सहकार्य मिळाले. आम्ही त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी माहिती दिली की हा देह कमीत कमी १५ डॉक्टरकीच्या विदयाध्र्यानां तयार करण्यासाठी, त्यांना संसोधन करण्यासाठी, शिक्षणासाठी उपयोगी पडू शकतो. जेव्हा हे विदयार्थी डॉक्टर बणून बाहेर पडतील तेव्हा कित्येक रूग्णांचे प्राण त्यांच्या सेवे मूळे वाचू शकतील. मॄत्यूनंतरही आमच्या आत्याबार्इंनी त्यांची महत्वाची भूमिका वठवली होती. त्यागाचे एक रोपटं त्या लावून गेल्या की ज्याचा निश्चीतच एक मोठा वटवॄक्ष होर्इल व या वटवॄक्षाच्या छायेचा लाभ भविष्यात कित्येक जीवाला होर्इल.
मी त्यांचा जावर्इ असलो तरी त्यांचे माझ्यावर पुत्रवत प्रेम होते. माझ्या वाढदिवसाला पहिला त्यांचाच फोन असायचा व फोन वरून त्या मला भरभरून शुभेच्छा व आर्शिवाद देत असत. माझ्या कुटंबातील वैदयकीय अडचणीत त्यांनी आम्हाला मोलाची साथ दिली. माझ्या जीवनातील आनंदाच्या प्रसंगी शुभेच्छारूपी आर्थिवाद दिले तर दुखा:च्या प्रसंगी धीर दिला. त्यांनी ‘महेशराव’ संबोधून मला जो सतत मान दिला तो जीवनातील इतर सन्मानापेक्षा निश्चितच मोठा व प्रेमळ आहे.
आमच्या आत्याबार्इ आदर्शवत जीवन तर जगल्याच तसेच त्यांनी मरणोत्तर ‘देहदान’ करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या या त्यागामूळे समाजात ‘देहदान’ विषयी जागरूकता निर्माण होर्इल. त्यांच्या या त्यागाबद्द्ल त्यांना सादर प्रणाम !| या पुण्यकामी संमंतीपत्रावर माझी सही घेवून मला सहभागी करून घेतले याबद्द्ल मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. माझ्या या लेखाव्दारे मी त्यांना श्रध्दांंजली अर्पण करतो.र्इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो: हीच विनम्र प्रार्थना!!

महेश भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog