काही हायकू देशाकरीता
मी फक्त
एक भारतीय
ताकीद सक्त
=========
जात धर्म
एक संस्कार
माणुसकीचा विचार
=============
कोणत्याही धर्मातील
पराकोटीची कट्टरता
विघातक देशाकरीता
===============
जातीजातीत द्वेष
पसरवू नका
विनाशक विष
==============
सगळेच आपण
एका देवाची लेकरे
फुकाचा धर्माभिमान
===============
कोणत्या जातीत जन्माला
यावे हे आपण ठरवू शकत नाही
कर्तृत्वात सर्वकाही
====================
सगळ्याचा रक्ताचा
रंग एकच
दंभ जातीचा उगाच
===================
कोणताही धर्म
द्वेष शिकवत नाही
जाणा हे मर्म
=================
दंगाधोप्यात होत्याचे
नव्हते होते
भारतमाता रडते
================
भारतमातेचे एकच
आहे मागणे
फक्त भारतीय बनून रहाणे
==================
© महेश भा. रायखेलकर
मी फक्त
एक भारतीय
ताकीद सक्त
=========
जात धर्म
एक संस्कार
माणुसकीचा विचार
=============
कोणत्याही धर्मातील
पराकोटीची कट्टरता
विघातक देशाकरीता
===============
जातीजातीत द्वेष
पसरवू नका
विनाशक विष
==============
सगळेच आपण
एका देवाची लेकरे
फुकाचा धर्माभिमान
===============
कोणत्या जातीत जन्माला
यावे हे आपण ठरवू शकत नाही
कर्तृत्वात सर्वकाही
====================
सगळ्याचा रक्ताचा
रंग एकच
दंभ जातीचा उगाच
===================
कोणताही धर्म
द्वेष शिकवत नाही
जाणा हे मर्म
=================
दंगाधोप्यात होत्याचे
नव्हते होते
भारतमाता रडते
================
भारतमातेचे एकच
आहे मागणे
फक्त भारतीय बनून रहाणे
==================
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment