माझे प्रेम 

प्रेमात घातले मी स्वतःलाच कुंपण
नाही घेतले तिचे एकदाही चुंबन !

असतील समजून सगळ्यांच्याच आमच्यावर   नजरा
नाही माळला तिच्या वेणींत मी गजरा !

तिचा बाप सदाच आमच्या प्रेमाला नाडी
नाही घेतली तिला एकही साडी !

नोकरी साठी फिरे मी अनवाणी
नाही देवू शकलो तिला हॉटेलात मेजवानी !

मूल्य-संस्काराचे भूत सदाच माझ्या पाठी
नाही मारली तिला एकदाही मिठी !

 तिच्या घरासमोर बांधलं होतं  भलंमोठं  कुत्र
नाही पाठवलं तिला एकही प्रेमपत्र !

तिच्यासोबतच्या सुखी - संसाराची बांधली मी इमले
तिच्या नकाराने सारेच थांबले !
 तिच्या नकाराने सारेच थांबले !!

© महेश भा. रायखेलकर


Comments

Popular posts from this blog