थोडं थांबूया, नंतर कृती करूया
खटकणारं बोललंच पाहिजे का?
थोडं चूप रहावं
दुसरे लागण्यासारखं बोलले तर कसं वाटेल ?
ते आपल्या मनाला पुसावं
अपमान केलाच पाहिजे का ?
थोडं गप्प रहावं
इतरांनी मान दिला नाही तर कसं वाटेल ?
हे आपल्या मनाला पुसावं
रागावणं केलंच पाहिजे का?
थोडं शांत बसावं
दुसऱ्यांनी संताप केला तर कसं कसं वाटेल ?
हे आपल्या मनाला पुसावं
टिंगल- टवाळी केलीच पाहिजे का ?
थोडं चूप रहावं
दुसऱ्यांनी टपली मारली तर कसं वाटेल
ते आपल्या मनाला पुसावं
निंदा-नालस्ती केलीच पाहिजे का ?
थोडं शांत रहावं
दुसऱ्यांनी द्वेष - तिरस्कार केला तर कसं कसं वाटेल?
ते आपल्या मनाला पुसावं
खोटं-नाट वागलं पाहिजे का ?
थोडं चांगलं वागावं
इतरांनी लांडी- लबाडी केली तर कसं कसं वाटेल ?
हे आपल्या मनाला पुसावं
फसवणूक केलीच पाहिजे का ?
थोडं प्रामाणिक राहावं
दुसऱ्यांनी टोपी घातली तर कसं कसं वाटेल ?
ते आपल्या मनाला पुसावं
ताठ वागलंच पाहिजे का का ?
थोडं नम्र रहावं
दुसऱ्यांनी गर्विष्ठपणा केला तर कसं वाटेल ?
हे आपल्या मनाला पुसावं
प्रत्येक कृती करतांना
थोडं थांबावं, अन बघावं
आपली कृती योग्य आहे का ?
ते आपल्या मनाला पुसावं !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment