धावपळीची सकाळ

अशी सकाळ सकाळ
पुरती होई धावपळ
साधा श्वासही घ्यायला
नसे मिळे पुरेसा वेळ

अशी सकाळ सकाळ
झाला  उठायला थोडा उशीर
पुढच्या सगळ्या कामांची
लागे  वाट अन घरघर

 अशी सकाळ सकाळ
कोणाचा आला त्यात फोन
तो घेवून  त्यावर बोलतांना
जीव जातो पुरता वैतागून

अशी सकाळ सकाळ
पोरगं उठायला करे  किरकिर
त्याच्या स्कुलची प्रिंसिपल
वाटे उभी आहे माझ्या समोर

अशी सकाळ सकाळ
त्यात वाचे मी पेपर
बायको आतून ओरडे
अहो आवरा कि हो  भरभर

अशी सकाळ सकाळ
कधी चालू केली मी मस्करी
मुलगा बायको पाहून ती
आपल्या डोक्यावर हात मारी

अशी सकाळ सकाळ
त्यात झाले जर भांडण
करून राग अन तणतण
अख्ख्या दिवस होई घाण


अशी सकाळ सकाळ
आला त्यात मित्र-पाहुणा
घरी आलेला त्यांना  पाहून
 जीव होई माझा केविलवाणा

अशी सकाळ सकाळ
बायको देई करून नाष्टा रुचकर
 धावपळीने  आलेला  शीण
खातांना क्षणात होई  दूर

अशी सकाळ सकाळ
सोडलं मुलाला  वेळेवर
मी ओफिलसला जावून
देई समाधानाची ढेकर

अशी सकाळ सकाळ
जीव जाई पुरता थकून
 साधा रविवार वाटे मग
आनंदाचा  आहे एक सण

© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog