मी एक सज्जन 

बालपणी बाहेरच्यांनी काही दिलं तर मी खात नाही
मित्रांची खेळणी घरी चोरून मी  आणत नाही
शाळेत उगाचच  कोणाला त्रास मी  देत नाही
आईबाबांकडे फालतू हट्ट मी करत नाही
स्वतःच्या फायदयासाठी खोटे मी बोलत नाही
कारण कि मी सज्जन असतो

कॉलेजमध्ये मुलींची छेड मी काढत नाही
सदाच तास बुडवून कॅन्टीन मध्ये मी बसत नाही
कॉपी करून परीक्षेत पास मी  होत नाही
अश्लील सिनमे थेटरात जाऊन मी पाहत नाही
कानात डूल व शर्टाची उघडी बटणे ठेवून मी  फिरत नाही
कारण कि मी सज्जन असतो

लाच देवून कोठे नोकरीला मी चिटकत नाही
नौकरीमध्ये भ्रष्ट्राचार करून पैसा मी कमवत नाही
उद्योग-धंद्यात छक्केपंजे करून  पुढे मी  जात नाही
प्रमोशनसाठी वरिष्ठांची हांजी-हांजी मी करत नाही
कर्जांचे हप्ते तटवून ते मी बुडवत नाही
बाई-बाटली-जुगार असली व्यसने मला जडत नाहीत
कारण कि मी सज्जन असतो

हुंडा-मानपानासाठी सासर्र्यांकडच्यांना छळत मी नाही 
बायकोला कमी लेखुन त्रास मी  देत नाही 
नातेवाईकांमध्ये उगीचच टेंभा मी मिरवीत नाही 
कोणाकडे सतत उसनावरी मी करत नाही 
मुलां-बाळांना -सदाच रागे मी भरत नाही 
कारण कि मी सज्जन असतो

रांग तोडून माझे काम मी साधून घेत  नाही 
सार्वजनीक वस्तूंचे नुकसान मी करत नाही 
काम करून घेण्यासाठी लाच मी देत नाही 
वाहतुकीचे नियम तोडून वाहन मी चालवत नाही 
कर चुकवण्यासाठी कोणतीही  लबाडी मी करत नाही 
कारण कि मी सज्जन असतो

जात-लिंगा  वरून कोणाला हीन मी समजत नाही 
सार्वजनीक शांतता कधीच भंग मी करीत  नाही 
पर्यावरणाचा मान राखण्यास कमीपणा मी  मानत नाही 
आपल्या परीने समाजसेवा करण्यास मागे मी  हटत नाही 
सरकारी जागेवर कोणतेच अतिक्रमण मी करत नाही 
कारण कि मी सज्जन असतो

मित्र-नातेवाईकांच्या खाजगी प्रश्नात नाक मी खुपसत नाही 
कोणाचीही निंदानालस्ती करणे माझ्या स्वभावात बसत नाही 
टिंगलटवाळी करणे माझ्याकडून कधीच होत नाही 
कोणालाही मदत करण्यास मागे मी पाहत नाही 
स्वतःचीच स्तुती करणे मला कधी जमत नाही 
कारण कि मी सज्जन असतो

मतदानाच्या दिवशी मत न टाकता सुट्टी मी घेत नाही 
राष्ट्रीय सणाला झेंडावंदन केल्या शिवाय मी राहत नाही 
राष्ट्राभिमान बाळगण्याची कधी मला लाज  वाटत नाही 
देशाची घटना न्याय-व्यवस्थेवर शंका मी घेत नाही 
प्रसंगी देशासाठी जीव देण्यास मागेपुढे मी पहात नाही 
कारण कि मी सज्जन असतो

वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात मी पाठवत नाही
कोणाची आई-बहीण काढून मी भांडत नाही
साहित्य-कलेचं मला वावडं असत नाही
संगीत- नाट्य- खेळास नाक मी मुरडत नाही
शरीर-प्रकृती न सांभाळता उगीच मी धावत नाही
छंदासाठी वेळ नाही असं मी म्हणत नाही
सण-वार रीती-रिवाज पाळण्यास माझी हरकत असत नाही
कारण कि मी सज्जन असतो

असा सज्जन  मात्र एक-एकटा असतो 
स्वतःची लढाई स्वतःच  तो लढतो 
कधी-कधी इतरांच्या  चेष्टेचा विषय तो बनतो
तरीही आपल्या मूल्य-तत्वांवर अढळ मात्र तो राहतो 
मला सांगा असा सज्जनपणा बाळगणे का त्याचा गुन्हा असतो ???

© महेश भा . रायखेलकर 












Comments

Popular posts from this blog