प्रेम भंग

जीवंतपणी मी भोगतोय मरण
प्रेमाचे आज माझ्या झालंय  सरण

सोडून गेली ती मला एकाकी
तिच्या जीवनातून झाली माझी वजाबाकी

भास होई ती आहे माझ्या जवळ
कधी हा संपणार जीवघेणा खेळ

तिच्यावाचून जीव होई माझा कासावीस
जशी पाण्याची आस कोण्या तहानल्यास

सतत येई मला तिचीच आठवण
आसवांची धार वाही माझ्या डोळयातून

सरला जीवनातील आनंदाचा काळ
हेच का माझ्या हाती माझ्या प्रेमाचे फळ

मला वाटे ती येईल परत फिरून
मनात उमले एक आशेचा किरण

  केला नाही तिने माझा थोडाही विचार
कसा वाहू तिच्या वाचून जीवनाचा भार

संपले आज एक सुंदर-गोड  स्वप्न
कटू सत्याचा आता झाले मला ज्ञान

चालावी लागेल वाट तिच्या वाचून
भावनेला मनाच्या कुपीत ठेवून


जा जा  असा जीवनाचा अंत नाही मी  करणार
पहिले प्रेम आहे माझे माझ्या जन्मावर


© महेश भा. रायखेलकर



Comments

Popular posts from this blog