हायकू कविता
काही दुःखांची सल
आयुष्यभर राहते
पाठलाग करते
**************
विसरायचं म्हटलं
तरी विसरू शकलो नाही तूला
सतत आठवण येते तुझी मला
**********************
हसण्याने दुःख
विसरले जाते
रडण्याने हलके होते
********************
का जात नाहीस तू
माझ्या आठवणीतून
गेलो मी त्रासून
******************
दुःख उगळत बसल्याने
वाढत जाते
सोडून द्या ते
*****************
या जगात अशक्य
काही नाही
सर्व काही शक्य
****************
स्पर्धा करायची तर
स्वतःशी करा
दिसेल खरा चेहरा
****************
निंदक मित्रासारखा
असतो
खोट दाखवतो
***************
संगीताने आयुष्य
सुंदर बनते
कोकिळा गाते
*************
निसर्ग भरभरून
देत असतो
माणूस कमी पडतो
***************
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment