हायकू
१. जन्म दिलेल पोरं
लावेल चितेला आग
सत्य कडू फार
२. काटा रुतता तुझ्या पायात
पाणी येई माझ्या डोळ्यात
कसा राहू सांग निवांत
३. जात जात असते
कोणी कोणाची
काढायची नसते
४. शरीराचा मांडला बाजार
पोटासाठी मी लाचार
नरकयातना भोगल्या फार
५. संस्कार म्हणजे दुसरे काही नाही
आई वडील कसे वागतात
मुलं ते पाही
६. तुझ्यात मी असा अडकलो
पुरता मी वाहून गेलो
माझा मी आता न उरलो
७. मी आहे म्हणे नासमज
असे म्हणणा-याला
द्यावी लागेल चांगली समज
८. मी कॉम्पुटरवर
मुलगा मोबाईलवर
बायको तव्यावर
९. हे कसले अभिव्यक्ती स्वतंत्र
सोडून दयावे त्यांनी
पुरते ताळतंत्र
१०. नाही तुझ्या मनात पाप
नको करून घेऊस असा
डोक्याला तू ताप
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment