हायकू कविता 

एकच आयुष्य
स्वप्ने  फार
झालो बेजार
====**======
न सतत रागवावे
थोड़े शांत रहावे
काही सोडूनिया द्यावे
====**=======
 लहान मुले
निरागस असतात
जातीभेद न करतात
====**=======
तू मला पाहिले
मी तुला पाहिले
मन एकमेकात  गुंतले
====**=======
मोर नाचतो
आनंदाच्या भरात
पाऊस कोसळे  जोरात
====**=======
तुला न कळले
मला न कळले
प्रेम हरले
====**=======
तुलाही भेटेल कोणीतरी
मलाही भेटेल कोणीतरी
प्रेम मात्र अधांतरी
====**=======
प्रेमापेक्षा मोठा
असतो व्यवहार
प्रेमाची तेथेच हार
====**=======
कोणावरतरी  प्रेम करावे
जगून पाहावे
मग मरावे
====**=======
कोन्हीही कोणासाठी
थांबत नाही
स्वार्थ प्रेत्येकाच्या ओठी
====**=======


© महेश भा. रायखेलकर






Comments

Popular posts from this blog