मनातले ..... काहीतरी 

आपल्यांनीच   इतके दुःख दिले मला कि
 बोल लावण्या   दुस-यास नसे मज वाव

राहते जेथे आहेस तू  सखे गं
त्यालाच मानले मी आज माझा गावं

शेतकरी राजा खपतो रात्रंदिवस शेतात
 कवडीमोल त्याच्या कष्टाच्या घामाला भाव

गरीब जनता मरे उपासमारीने देशात
नेते मारिती मलिद्यावर उभा- आडवा   ताव

माणूस धावतो  जन्मभर उर फुटेपर्यंत
 संपत नाही कधीच त्याच्या सुखाची हाव

पुन्हा,पुन्हा  येवू नकोस  अशी   आठविणीतून
 नकोस घालूस    परत माझ्या जखमेवर घाव

 जगी  असा एक माणूस दाखवा तुम्ही मला
कळला ज्यास   नशिबाच्या मनीचा ठाव

जाळावे  स्वतःला,  चालावे उभ्या  निखा-यातून
तेव्हा  कोठे होते या  जगी माणसाचे   नाव

 खेळण्या आधीच  का मोडतो  असा रे
 देवा अर्ध्यावरच काहींचा  जीवनाचा  डाव

© महेश भा. रायखेलकर





Comments

Popular posts from this blog