माझी हायकू
तू नसलीस तरी
मी जगून घेईन
जगण्याचे कारण नसले जरी
-----------**------------
काय तुझ्या मनात
नाही मला समजलं
कोड हे कधीच नाही सुटलं
------------**-----------
का खेळलीस असा
जीव घेणा खेळ
पाण्यावाचून तडफडे मासा
----------**-----------
मी कोणाला त्रास दे नाही
आणि कोणाचाही त्रास
सहनही करून घेत नाही
-------**-------------
जीवन म्हणजे शर्यत
कधी हार तर
कधी जीत
----**--------------
प्रेम केलेच का पाहिजे
जगण्यासाठी दुसरे
कारण नाही का दुजे
-----**-----------
जीवनाची संध्याकाळ
दिवस जाता जाईना
मरण जवळ घेईना
-----**------------
समाजात वृद्धाश्रम
वाढलेत फार
आई वडिलांनी गाळीला घाम
-----**--------------------
तू नव्हती कधीच माझी
माझ्या मी भ्रमात
पाही तुला स्वप्नात
-----**------------------
तझ्या नादी लागून
गेलो मी पुरता वाहून
काळ-वेळ गेलो विसरून
----**--------------------
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment