माझ्या हायकू कविता
तुझा सहवास
हवाहवासा वाटतो
तू माझा श्वास
=============
नाही म्हणालीस तरी
मी रागावणार नाही
नकाराची सल आयुष्यभर उरी
===================
नको अशी
सोडून मला तू जाऊस
आत्त्ताच तर पडतोय पाऊस
=================
सकाळ पासून संध्याकाळ
पर्यंत तुझीच आठवण मनी
जसा की थांबलाय काळ
=================
जीवन जगण्यासाठी
फार काही लागत नाही
धडपड सर्व असावे गाठी
================
पोट भरण्यासाठी
व्यवसाय नोकरी अवश्य करावी
छंद मन भरण्यासाठी
==================
तू तेव्हा होती तशीच
आताही आहे
बदललोय मीच
=================
काळ वेळ
कोणासाठी थांबत नाही
यातच आले सर्वकाही
==============
मी वचन
देतो तूला
शब्दांची भलावण
===========
नात्यात जेव्हा
अंतर पडते
काहीच ना उरते
==========
© महेश भा. रायखेलकर
तुझा सहवास
हवाहवासा वाटतो
तू माझा श्वास
=============
नाही म्हणालीस तरी
मी रागावणार नाही
नकाराची सल आयुष्यभर उरी
===================
नको अशी
सोडून मला तू जाऊस
आत्त्ताच तर पडतोय पाऊस
=================
सकाळ पासून संध्याकाळ
पर्यंत तुझीच आठवण मनी
जसा की थांबलाय काळ
=================
जीवन जगण्यासाठी
फार काही लागत नाही
धडपड सर्व असावे गाठी
================
पोट भरण्यासाठी
व्यवसाय नोकरी अवश्य करावी
छंद मन भरण्यासाठी
==================
तू तेव्हा होती तशीच
आताही आहे
बदललोय मीच
=================
काळ वेळ
कोणासाठी थांबत नाही
यातच आले सर्वकाही
==============
मी वचन
देतो तूला
शब्दांची भलावण
===========
नात्यात जेव्हा
अंतर पडते
काहीच ना उरते
==========
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment