Posts

Showing posts from 2026
Image
  "सोलापूरची खाद्यसंस्कृती"  चवीचे खाणार त्याला सोलापुरात सर्वकाही मिळणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. किती विविध पदार्थ सोलापुरात मिळतात नुसती उजळणी जरी केली तरी तोंडाला पाणी सुटेल. मी मुळचा सोलापूरचा नाही पण मागील २० - २५ वर्षांपासून सोलापुरात राहतो आहे व आजपर्यंत जे काही घरचे सोडून  सोलापुरात बाहेर खाल्ले आहे त्याच्या अनुभवावरून हे लिहले आहे . एखादे सोलापुरात ठिकाण किंवा पदार्ध असेल तो मी चाखला नसेल तर त्याचा उल्लेख येथे आलेला नाही.  तेव्हा कृपया कोणताही गैरसमज  नको. 'डिस्को भजी' हा भज्याचा प्रकार सोलापुरातच मी पहिल्यांदा खाल्ला . केलेली मिर्ची भजी कापून पुन्हा एकदा तेलात तळून कडक केली जातात. त्यासोबत शेंगा चटणी आणि कढी व बारीक कांदा दिला जातो हे सर्व  एकदम अप्रतिम . बहुतेक सर्व भज्यांच्या गाड्यावर हा  डिस्को भजी प्रकार मिळतोच. सोलापूरची शेंगाची चटणी आणि कडक भाकरी ही फक्त सोलापुरात नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध आहे. परदेशातही ही निर्यात केली जाते. सोलापूरचे 'नसले बंधू' यासाठी प्रसिद्ध आहेत. काही बचत गटा मार्फत देखील कडक भाकरी बनवली जाते. यातून म...
Image
  संघ शताब्दी वर्षानिमित्त लिहलेला लेख  "माझा संघ प्रवास"  लहानपणी एकदा मोठ्या भावासोबत उस्मानाबाद सध्याचे धाराशिव येथे  शाखेत आणि  त्याच शहरात कॉलेज मध्ये असतांना वर्ग मित्रा सोबत अ.भा.वि.प. च्या एका बैठकीला गेलो असल्याचे आठवतंय. तेवढाच काय तो तेव्हा माझा संघाचा किंवा संघ परिवाराशी संबंध . खरा संघाचा मी जोडला गेलो ते सोलापूरला वडिलांची बदली झाल्यानंतर. वडील हे त्यावेळी पी. एस. आय. म्हणून लातूर येथे कार्यरत होते. त्यांना ए. पी. आय. चे प्रमोशन मिळाले आणि त्यांची सोलापूरला बदली झाली. १९९४-९५ तो काळ असेल. सोलापूरला राहण्यासाठी आम्हाला केशवनगर येथील पोलीस वसाहतीत ऑफिसरचे निवासस्थान मिळाले होते. संगणकाचे वारे त्यावेळीस चांगलेच वाहत होते. आपणही संगणकाचा एखादा अभ्यासक्रम करावा या दृष्टीने मी लष्कर मधील न्यू-एज कॉम्प्युटर येथे सी. सी. सी. ओ . या तेव्हा प्रचलीत अशा सरकारमान्य कॉम्प्युटर कोर्सला प्रवेश घेतला. तेथेच माझी माझ्या सोबत हाच कोर्स करत असलेल्या प्रदीपसिंग राजपूत यांची ओळख व नंतर मैत्री झाली. त्यांनी मला एके दिवशी शाखेवर नेले ज्या शाखेवर ते मुख्य शिक्षक म्हणून का...
Image
  "मी कापलेला पहिला केक"  आम्ही एकूण तीन भावंडं . मोठा एक भाऊ, मधली बहीण व मी सर्वात लहान अर्थात शेंडीफळ . लहानपणी आमच्याकडे वाढदिवस करण्याची प्रथा नव्हती. त्याला कारणही तसेच होते. माझी  दोन का तीन भावंडं ही जन्मतःच  एक  तर मला आईच्या सांगण्यावरून ५-६ वर्षाचा झाल्यानंतर वारली. तेव्हा मोठा भाऊ ज्याला आम्ही अण्णा असे म्हणतो तो नवसाचा. त्याच्या पायात कित्येक वर्ष चांदीची  बेडी होती नंतर त्याने ती मोठेपणी  हातात कडे करून घातली. मी कधी कधी विचार करतो ही वारलेली भावंडं  जर वाचली असती तर कदाचित माझा नंबरही लागला नसता. कोण्याच्यातरी जाण्याने मी या जगात आलो असे मी हसून कधी कधी माझ्या सौ ला म्हणत असतो  .  नवसाची मुलं असल्याने त्यांचे कोडकौतूक करू नये,  कोणाची नजर त्यांना लागू नये असा काहीसा विचार आम्हा आई-वडिलांचा असावा, म्ह्णून लहानपणी आम्हा भावंडांचा वाढदिवस कधी साजरा केला असे मला आठवत नाही. आत्तासारखी केक- बेक कापणे ही प्रथा तर त्यावेळी अजिबात नव्हती. तेव्हा आजवरच्या आयुष्यातील पहिला केक मी वयाच्या २३-२४ व्या वर्षी कापला. तो ही माझ्या...
Image
  "सरांची राहिलेली भेट"  एस. आर. पाटील सर माझे धाराशिव येथील जिल्हा परिषद शाळेतील ५ वी ते १०वी  एन . सी . सी. आणि सायन्सचे सर . सरांचा शिस्तीचा माझ्यावर खुप मोठा प्रभाव . आजही बोटाची नखे वाढली किंवा डोक्यावरची केस वाढली की वेळेत काढली जातात कारण ही वाढली की त्याकाळी सरांची छडी ठरलेली . शाळेला जायला कधी उशीर झाला तर पहिले गेटवर सरांची हातावर छडी खाल्ल्याशिवाय शाळेत प्रवेश मिळत नसे . एन . सी . सी. कॅम्प , परेड सारे काही आठवते  . सरांचा रुबाबदार चेहरा , पिळदार मिश्या , १५ ऑगस्ट २६ जानेवारी सर पांढरेशुभ्र धोतर व वर नेहरू शर्ट अशा पेहरावात असत . मागे बऱ्याच वर्षापूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे संघाचे महासंचलनाच्या वेळी सरांची धावती भेट झाली तेव्हा सर हसून म्हणाले होते " रायखेलकर एन . सी . सी. मधे शिस्त आणि संघात देखील शिस्त " . ती भेट शेवटची . धाराशिव संघ बांधणी मधे सरांचा वाटा मोलाचा. एकदा धाराशिव मधे बहीण असल्याने "राखीपौर्णिमेस धाराशिव येथे येणार आहे मला तुम्हाला भेटायचंय सर "असे फोनवर बोललो होतो पण सरांची बहीण सोलापूरला असल्याने ते राखीपौर्णिमेस सोलापूरला ये...
Image
  "चलो इश्क लड़ाए" आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. सर्वत्र प्रेमाचा महापूर. पाश्चात संस्कृतीच्या  या  खुळाने   आपल्या देशातही चांगलेच बाळसे धरले आहे. बाजारपेठेचा रेटा याला बराचसा कारणीभूत  आहे. एक दिवस प्रेमाचा चांगल्या रीतीने साजरा केला तर कोणाची काय हरकत असणार आहे .  फक्त त्याला भलतंच वळण लागू नये एवढेच. आपल्याकडे मुलगा-मुलगी/ स्त्री -पुरुष याच्या प्रेमाचे जास्तीचेच उदात्तीकरण केले गेले आहे. त्याला आपली चित्रपट सृष्टी कारणीभूत आहे. तसेच लेखक, कवी, शायर यांनी देखील यावरच भरभरून लेखन करून यात भरच घातली आहे. या पलीकडेही प्रेमाची काही व्याख्या असू शकते हे कोणाच्या खिजगिणतही नाही.  इश्क दुसऱ्याही बाबतीत लढवलं जाऊ शकतं याची कल्पनाही नाही.  शेवटी प्रेम म्हणजे काय तर उद्दात्त भावनेचे प्रगटीकरण. आपले सर्वस्व अर्पण करण्याची तयारी. माणूस हा सर्व प्राणीमात्रात भावनाप्रधान आहे. त्याच्या प्रत्येक कृतीला भावनेची जोड असते. प्रेमात पडलेला व्यक्ती ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याच्यासाठी तो वेडा झालेला असतो. पण मी म्हणतो प्रत्येक वेळेस प्रेम म्हणजे एखादी व्यक्...
Image
"छत्रपती    शिवाजी महाराज आता असते तर" छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातील एक अलौकिक व्यक्तिमत्व. असा एकही मराठी माणूस नाही की छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव काढताच त्याचा उर अभिमानाने भरून येणार नाही. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आंपल्या सर्वांचे जीवन उजळून निघाले असते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे निर्माण केलेले स्वराज्य जिथे सर्व जाती धर्माची माणसे सुखाने, आनंदाने राहू शकत होती  . स्त्रियांचा सन्मान केला जात होता . जाती-धर्माला कोणतीही हानी पोहोचत  नव्हती  . आज जर ते असते तर हे सर्व काटेकोरपणे अंमलात आणले गेले असते.  आज आपण स्वतंत्र्य आहोत. लोकशाही मानणारा देश म्हणून जगात आपल्याला मान आहे. अनेक क्षेत्रात जगात आपण नाव कमावले आहे. पण हे सर्व नक्कीच एकदम झालेले नाही . यासाठी अनेक जण अक्षरशः खपले आहेत . या सर्वात आपली भूमिका नेमकी काय ? हे समजून घेणे गरजेचे आहे. नागरिक म्हणून आपण आपले हक्क तर मोठ्या दिमाखात मागतो मग कर्तव्याचे काय ? त्या बाबतीत आपण एवढे निरुत्साही का ? महापुरुषांच्या जयंत्या , पुण्यतीथ्या , मिरवणुका एवढ्या पुरते आपण स्वतःला बांधून...
Image
  श्रीराम नवमीच्या निमित्ताने...   ज्याचा शत्रू एवढा श्रेष्ठ ते श्रीराम सर्वश्रेष्ठ  ही कथा खरी आहे का काल्पनिक मला माहित नाही. मी ही कथा हिंदी मधील  प्रसिद्ध कवी , प्रवचनकार  श्री. कुमार विश्वास यांच्या प्रवचनाच्या व्हिडीओ क्लिप मधून ऐकली. यातील भाव मला खूपच आवडला. श्रीराम नवमी निमित्त आपल्या समोर ही कथा मांडण्याचा हा प्रयत्न.  युद्ध टाळण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात . सीतेची रावणाच्या बंदीवासातून  सुटका करून आणायची असेल तर  शेवटी  रावणा सोबतचे युद्ध हे अटळ आहे हे प्रभू श्रीरामाच्या लक्षात येते . युद्धाला जाण्या अगोदर समुद्र किनारी जेथे श्रीरामाची सर्व वानर सेना युद्धासाठी तयार आहे अशा ठिकाणी संकल्प पूर्तीसाठी यज्ञ करावा असे श्रीराम ठरवतात. त्यासाठी  पौरोहित्य  करणारा शिवभक्त , वैष्णव पुरोहितच हवा अशी मनीषा ते बाळगतात.  या पूजेचे  पौरोहित्य  कोण करणार ?  त्यासाठी असा ब्राम्हण  कोठे मिळणार ?  हा यक्ष प्रश्न श्रीरामापुढे पडतो.  पुरोहिता शिवाय  पुजा होऊ शकत नाही आणि या समुद्र तटावर, अशा ज...